एक्स्प्लोर

सरकार गेल्या वर्षीचा गहू खरेदीचा विक्रम मोडणार, आत्तापर्यंत कोणत्या राज्यातून किती खरेदी?

सध्या सरकारकडून (Govt) मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी (Wheat Procurement) सुरु आहे. मागील वर्षीचा गहू खरेदीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

Wheat Procurement : सध्या सरकारकडून (Govt) मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी (Wheat Procurement) सुरु आहे. मागील वर्षीचा गहू खरेदीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाची खरेदी 261 लाख टनांच्या जवळपास आहे. ही खरेदी 270 लाख टनांपर्यंत पोहोचेल असा विश्वास FCI च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. सध्या 260.8 लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी झालीय. त्यामुळं सरकार यावर्षी मागील वर्षीच्या गहू खरेदीचा विक्रम मोडण्याची शक्यता दाट आहे. कारण अद्यापही अनेक राज्यांमध्ये सरकारकडून गव्हाची खरेदी सुरु आहे.

पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशने गहू खरेदीचा कालावधी हा 31 मे पर्यंत वाढवला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये आत्तापर्यंत जास्त गव्हाची खरेदी केली आहे. उत्तर प्रदेशातही गहू खरेदीला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 124 लाख टन तर हरियाणामध्ये 71.4 लाख टन गव्हाची खरेदी झाली आहे. 

गव्हाची खरेदी 270 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, एकूण गव्हाची खरेदी ही 270 लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य पुरविण्याच्या अन्न सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी सध्याची खरेदीची पातळी आणि आमच्याकडे असलेला साठा पुरेसा असेल. आमच्याकडे बाजारासाठी चांगला साठा देखील असेल. गरज पडल्यास किमती तपासण्यासाठी हस्तक्षेप केला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील गव्हाची खरेदी कमी झालीय. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील खरेदीमध्ये लक्षणीय वाढ झालीय. सध्याची खरेदीची पातळी पाहता, सरकार यावर्षी गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवेल अशी शक्यता नाही. 

कोणत्या राज्यात गव्हाची किती खरेदी?

पंजाब -  124 लाख मेट्रीक टन
हरियाणा  - 71.4 लाख मेट्रीक टन
मध्य प्रदेश - 47.2 लाख मेट्रीक टन
उत्तर प्रदेश - 8.9 लाख मेट्रीक टन
राजस्थान - 9.1 लाख मेट्रीक टन 

मागील वर्षीच्या तुलनेत मध्य प्रदेशात गव्हाची खरेदी कमी

मिळालेल्या माहितीनुसार पंजाब आणि हरियाणा गहू खरेदीत आघाडीवर असलेली राज्य आहेत. या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी झालेली दिसत आहे. तर मध्य प्रदेशात मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या खरेदीचं प्रमाण कमी झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सोयाबीन, गहू, तांदूळ, कापूस, शरद पवारांनी शेतातलं सगळंच काढलं; मोदींच्या 10 वर्षातलं दरपत्रकच मांडलं

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Embed widget