एक्स्प्लोर

VI : वोडाफोन आयडियाच्या 20 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट, सरकारची मदत न मिळाल्यास कंपनी चालवणं...?

Vodafone India : वोडाफोन आयडिया कंपनी आर्थिक संकटातून अद्याप सावरलेली नाही. वोडाफोन आयडियानं सरकारची मदत न मिळाल्यास या आर्थिक वर्षानंतर कंपनी चालवणं अवघड होईल, अशी भूमिका घेतलीय.

 Vodafone India : कर्जात बुडालेल्या वोडाफोन आयडिया कंपनीबाबत एक अपडेट समोर आली आहे. सरकारी मदतीशिवाय या आर्थिक वर्षानंतर कंपनी चालवणं अवघड असल्याचं  वोडाफोन आयडियानं सरकारला सांगितल्याचं वृत्त सीएनबीसी टीव्ही 18 नं सूत्रांच्या आधारे दिलं आहे. याशिवाय सरकारची भागिदारीची रक्कम देखील शून्य होईल, अशी माहिती सरकारला कळवली आहे.  वोडाफोन आयडियामध्ये सध्या सरकारची भागीदारी 49 टक्के इतकी आहे. 

वोडाफोन आयडियानं सरकारला इशारा दिला आहे की त्यांच्या पाठिंब्याशिवाय आर्थिक वर्ष 2025-26 च्या पुढं काम करु शकणार नाही. दिवाळखोरी मुळं कंपनीला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे जावं लागेल, असं देखील सरकारला वोडाफोन आयडियानं कळवल्याची माहिती आहे. 

वोडाफोन आयडियाच्या मते सरकारनं जर मदत केली नाही तर त्यांच्या भागीदारीचं मूल्य शून्य होऊ शकतं. ज्यामुळं कंपनीकडून 1.18 लाख कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रम च्या थकीत रकमेची वसुली होऊ शकणार नाही. 26000 कोटींच्या इक्विटी इन्फ्यूजन आणि सरकारकडून कंपनीत भागीदारी घेतल्यानंतर देखील बँकांचा पाठिंबा मिळाला नाही, असं वीआयचं म्हणणं आहे. 

वोडाफोन आयडियानं सरकारला सांगितलं की त्यांच्या पाठिंब्याशिवाय आणि बँकेच्या फंडिंगशिवाय आर्थिक वर्ष 2025-26 च्या पुढं कंपनी चालवता येणार नाही. जर सरकारी मदत मिळाली नाहीत तर वीआयला एजीआरची थकीत रक्कम देण्यात अयशस्वी ठरल्यास कंपनीला  एनसीएलटीकडे जावं लागेल.जी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. 

वीआय जर एनसीएलटीमध्ये गेली तर त्याचा परिणाम 20 कोटी ग्राहकांवर होईल. वोडाफोन आयडियानं त्यांच्या स्पेक्ट्रमचं देणं देण्यासाठी सरकारला इक्विटीत भागीदारी दिली आहे.वोडाफोन आयडियात सध्या सरकारकडे इक्विटीत भागीदारी 49 टक्के इतकी आहे. कंपनीनं सरकारला एजीआर आणि स्पेक्ट्रम मिळून 1.95 लाख कोटी रुपये देणं आहे. 

वीआयचे 59 लाख छोटे शेअर धारक असून त्यांच्या भागीदाराची मूल्य 2 लाख कोटी इतकं आहे. कंपनीचं बाजारमूल्य 80000 कोटी इतकी आहे. 16 मे रोजी कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्के तेजी आल्यानं शेअर 7.37 रुपयांवर पोहोचला आहे.

वोडाफोन आयडियानं एजीआर रक्कम जमा करण्यातून दिलासा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात एक नवी याचिका केली आहे. कंपीनं त्यांच्या याचिकेत एजीआरवरील यापूर्वीच्या निर्णयाचा दाखला दिला आहे आणि थकीत देणं जे आहे त्यापैकी 30000 कोटी माफ करण्याची मागणी केली आहे. वीआयच्यामते एजीआरच्या निर्णयानं घालण्यात आलेल्या अडथळ्यांमुळं सरकार यापुढं दिलासा देत नाही. अतिरिक्त सरकारी मदत मिळाली नाही तर हे क्षेत्र बर्बाद होईल, असं वीआयनं म्हटलं. कंपनीनं सुप्रीम कोर्टाला यावर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी केलीय. सुनावणी 19 मे रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Embed widget