Paytm: झोमॅटोनं पेटारा उघडला, 2 हजार कोटींचा खर्च करणार, पेटीएमचा व्यवसाय खरेदी करणार,कर्मचाऱ्यांचं काय होणार?
Zomato: पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी या डीलबाबत माहिती दिली आहे. झोमॅटो आता खाद्यपदार्थ पोहोचवण्यासोबत तिकीट व्यवसायात उतरणार आहे.
![Paytm: झोमॅटोनं पेटारा उघडला, 2 हजार कोटींचा खर्च करणार, पेटीएमचा व्यवसाय खरेदी करणार,कर्मचाऱ्यांचं काय होणार? Vijay Shekhar Sharma said Paytm sold its entertainment ticketing business to Zomato for 2048 crore rupees Paytm: झोमॅटोनं पेटारा उघडला, 2 हजार कोटींचा खर्च करणार, पेटीएमचा व्यवसाय खरेदी करणार,कर्मचाऱ्यांचं काय होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/22/6ae641559839c1e80971fc8221c4cd4a1724265358080989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी देशातील अग्रणी झोमॅटोनं (Zomato) ने फिनटेक कंपनी पेटीएम (Paytm) च्या मनोरंजन क्षेत्रातील तिकीट विक्रीचा व्यवसाय खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये 2048 कोटी रुपयांची डील झाली आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सनं (One 97 Communications) बुधवारी एक्सेंज फायलिंगमध्ये या निर्णयाची माहिती दिली. तिकीट विक्री व्यवसायातून बाहेर पडल्यानं पेटीएम आता पेमेंट आणि वित्तीय सेवा व्यवसायात पूर्णपणे लक्ष देणार आहे.
विजय शेखर शर्मा यांचं शेअरधारकांना पत्र
झोमॅटोच्या सोबत डीलची घोषणा झाल्यानंतर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी शेअरधारकांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी आम्ही आता आमच्या मूळ व्यवसायात लक्ष देऊन नफा मिळवून देणारं मॉडेल तयार करण्यावर लक्ष देणार असल्याचं म्हटलं. पेटीएमसाठी आम्ही लाँग टर्म प्लॅन तरायर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आव्हानांचा सामना केला आहे. आता आम्ही त्या धक्क्यांमधून सावरलो असून यातून पुढं जायची तयारी करतोय, असं विजय शेखर शर्मा म्हणाले.
Update: We're excited to share that we've entered into agreements to sell our entertainment ticketing business, including movies, sports, and events, to Zomato for ₹2,048 cr. This move allows us to focus more on core payments & financial services. We built movie ticketing from… pic.twitter.com/TRnBUiIlTW
— Paytm (@Paytm) August 21, 2024
पेटीएम इनसायडरच्या 280 कर्मचाऱ्यांचं काय होणार
वन 97 कम्युनिकेशन्सनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं की ते पेटीएम इनसायडरची 100 टक्के हिस्सेदारी झोमॅटोला विकणार आहे. ही डील कॅश फ्री आणि डेट फ्री मॉडेलवर झाली आहे. पेटीएमच्या मनोरंजन क्षेत्रातील तिकीट विक्रीचं काम करणाऱ्या टीमच्या 280 कर्मचाऱ्यांना देखील झोमॅटोला वर्ग केलं जाईल. पेटीएम इनसायडरद्वारे सिनेमा, स्पोर्टस आणि कार्यक्रमांच्या तिकिटांची विक्री केली जाते. ही सेवा पुढील 12 महिने सुरु राहील.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)