एक्स्प्लोर

Online Payment Rule : वापरात नसलेले यूपीआय आयडी 1 जानेवारीपासून होणार बंद, 31 डिसेंबरपूर्वी करावं लागेल हे काम, नवीन नियम लागू

1 January 2024 UPI Payment Rule: सुरक्षेच्या कारणास्तव NPCI ने युनिफाइड इंटरफेस पेमेंटसाठी नवीन नियम लागू केला असून त्या माध्यमातून अनेक यूपीआय आयडी बंद करण्यात येणार आहेत. 

1 January 2024 UPI Payment Rule : यूपीआय वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 जानेवारीपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) काही युनिफाइड इंटरफेस पेमेंट म्हणजे यूपीआय (UPI) अकाऊंट बंद करण्यात येणार आहेत. जर एखाद्या यूपीआय आयडीवरून तुम्ही एका वर्षात एकदाही ऑनलाईन पेमेंट केलं नाही तर तुमचा आयडी ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे बंद असलेला यूपीआय आयडी तुम्हाला 31 डिसेंबरच्या आधी अॅक्टिव्ह करावा लागेल. 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने म्हटले आहे की, जर तुम्ही UPI ID द्वारे एका वर्षापेक्षा जास्त काळ ऑनलाइन व्यवहार केले नाही तर तुमचा आयडी 31 डिसेंबरपासून ब्लॉक केला जाईल. या निर्देशाचा Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या प्लॅटफॉर्मवरही परिणाम होईल. याशिवाय 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला तुमचा जुना आयडी सक्रिय करावा लागेल. तुम्ही तुमच्या जुन्या आयडीने पेमेंट करून ते सक्रिय करू शकता.

निष्किय आयडी ब्लॉक करण्याच्या सूचना

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने निष्क्रिय UPI आयडी ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ असा की तुमचा न वापरलेला आयडी 1 जानेवारी 2024 पासून ब्लॉक केला जाईल.

त्याचा परिणाम काय होईल?

वास्तविक Google Pay, PhonePe आणि Paytm सारखे प्लॅटफॉर्म ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी UPI आयडी वापरतात. हे आयडी मोबाइल नंबरशी जोडलेले असतात. बर्‍याच वेळा एका मोबाईल नंबरशी अनेक UPI आयडी जोडलेले असतात, जे दीर्घकाळ वापरले जात नाहीत.

आयडी ब्लॉक टाळण्यासाठी काय करावे?

तुमचा जुना निष्क्रिय आयडी बंद होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला 31 डिसेंबरपूर्वी तो सक्रिय करावा लागेल. यासाठी तुम्हाला UPI आयडीद्वारे पेमेंट करून ते सक्रिय करावे लागेल.

जुना UPI ID का बंद होत आहे?

NPCI अहवालानुसार, ग्राहक जुना UPI आयडी निष्क्रिय न करता नवीन मोबाइलवरील नवीन UPI ​​ID शी मोबाईल नंबर लिंक करतात. या संदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. NPCI च्या सूचनेनुसार, सर्व बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सनी UPI आयडी निष्क्रिय करणे सुरू केले आहे. वास्तविक जुन्या UPI आयडीने फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते. अशा स्थितीत NPCI कडून ते ब्लॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) आणि घोटाळ्यांची वाढती प्रकरणे पाहता सरकार आता युनिफाइड इंटरफेस पेमेंटसाठी नवीन नियम लागू करत आहे. नवीन नियमाबाबत, NPCI ने UPI सेवा कंपन्या आणि बँकांना मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सIndia vs Australia:ऑस्ट्रेलियात वाट्याला अपयश,रोहित-विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह Special ReportPune Pub News : Condom-ORS चं पाकीट वाटप; पुण्यात पबचं 'प्रमोशन' संस्कृतीचं 'डिमोशन' Special ReportMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  31 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
Nashik Nandgaon Fog : नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Sharad Ponkshe : द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Embed widget