(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Upcoming IPO: नोव्हेंबरमध्ये आयपीओची रांग, स्विगी-एनटीपीसीसह दिग्गज कंपन्यांचा समावेश,गुंतवणूकदारांना मोठी संधी
IPO Market: नोव्हेंबर महिन्यात स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आणि मोबिक्विकसह इतर कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत.
IPO Market मुंबई: शेअर बाजारात 2024 मध्ये अनेक कंपन्यांचे आयपीओ लिस्ट झाले आहेत. एका पाठोपाठ छोट्या मोठ्या कंपन्यांचे आयपीओ शेअर मार्केटमध्ये येत आहेत. यापैकी अनेक आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. दिवाळीच्या ब्रेकनंतर मोठ्या प्रमाणात आयपीओ शेअर मार्केटमध्ये येणार आहेत. यामध्ये स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आणि मोबिक्विक सारख्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. सेबीकडून या कंपन्यांच्या आयपीओला परवानगी यापूर्वीच मिळाली आहे.
स्विगी (Swiggy)
स्विगीचा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी 6 नोव्हेंबराल खुला होईल. स्वीगीचा आयपीओ जवळपास 11800 कोटी रुपयांचा असेल. यामध्ये ऑफर फॉर सेलद्वारे शेअरची विक्री केली जाईल. या आयपीओवर झोमॅटोची देखील नजर असेल.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी (NTPC Green Energy)
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील नवीकरणीय ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ देखील लवकरच येणार आहे. एनटीपीसीच्या आयपीओवर देखील गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय.
एक्मे सोलर होल्डिंग्स (Acme Solar Holdings)
एक्मे सोलर होल्डिंग्स हीं कंपनी सौर ऊर्जा प्रकल्प चालवते.इंजिनियरिंग, प्रोक्यूरमेंट, कंस्ट्रक्शन, ऑपरेशन्स आणि मेंटेनेंस देखील करते. एक्मे सोलर होल्डिंग् केंद्र आणि राज्य सरकारला वीज विकून उत्पन्न मिळवते.
निवा बूपा हेल्थ इन्शुरन्स (Niva Bupa Health Insurance)
निवा बूपा आरोग्य विमा कंपनी आहे. आरोग्य विमा क्षेत्रात या कंपनीचा वाटा 16.24 टक्के आहे. स्टार हेल्थनंतर आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी आहे.
वन मोबिक्विक सिस्टीम्स (One Mobikwik Systems)
मोबिक्विक ची स्थापना बिपिन प्रीत सिंह (Bipin Preet Singh) आणि उपासना टाकू (Upasana Taku) यांनी केली होती. क्यूआर, ईडीसी मशीन आणि मर्चंट कॅश अँडव्हान्स सारख्या सेवा पुरवतात. या कंपनीची उपकंपनी झाकपे (Zaakpay) ईकॉमर्स कंपन्यांना पेमेंट गेटवे सर्व्हिस पुरवते. मोबिक्विकचा आयपीओद्वारे 700 कोटी उभारण्याचा प्रयत्न आहे.
सागिलिटी इंडिया (Sagility India)
या कंपनीची स्थापना 2021 मध्ये बंगळुरुत झाली होती. आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांसाठी व्यवस्थापन सेवा पुरवण्याचं काम ही कंपनी करते.
झिंका लॉजिस्टिक्स (Zinka Logistics)
ही कंपनी ट्रक ऑपरेटर्सला वेगवेगळ्या सेवा पुरवते. या कंपनीचा आयपीओद्वारे 550 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. पेमेंट मॅनेजमेंट, टेलीमेटिक्स आणि वाहन वित्त सेवा पुरवते. कंपनीनं मार्च 2024 पर्यंत जवळपास 200 कोटींच्या कर्जाचं वाटप केलं आहे.
इतर बातम्या :
स्विगीच्या आयपीओबाबत महत्त्वाची अपडेट, 'या' दिवसापासून गुंतवणूक करता येणार? पैसे ठेवा तयार!