एक्स्प्लोर

देशातील सर्वात 10 श्रीमंत खासदार कोणते? नेमकी किती आहे संपत्ती? सविस्तर माहिती एका क्लिकवर

लोकसभेवर निवडून आलेल्या 543 खासदारांपैकी 503 खासदार कोट्यधीश आहेत. देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे.

Top 10 Richest MP: लोकसभा निवडणुकांची (Loksabha election)  रणधुमाळी संपली आहे. या निवडणुकीत भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए आघाडीन जास्त जागा मिळवत पुन्हा सरकार स्थापन केलं आहे. नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. दरम्यान, यावेळी लोकसभेवर निवडून आलेल्या 543 खासदारांपैकी 503 खासदार कोट्यधीश आहेत. देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे. जाणून घेऊयात  देशातील 10 सर्वात श्रीमंत खासदारांची माहिती. 

डॉ चंद्रशेखर पेम्मासानी (Dr Chandra Sekhar Pemmasani)

आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर डॉ.चंद्र शेखर पेम्मासानी यांनी विजय मिळवला आहे. मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्रीही होते. त्यांची एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये आहे. ते या संसदेतील सर्वात श्रीमंत खासदार आहेत.

कोंडा विश्वेश्वर रेड्डी  (Konda Vishweshwar Reddy) 

कोंडा विश्वेश्वर रेड्डी भाजपच्या तिकीटावर तेलंगणातील चेलेवा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवरून विजय मिळवला होता. त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 4568 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत.

नवीन जिंदाल (Naveen Jindal) 

भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा मुलगा नवीन जिंदाल कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकला आहे. जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांची एकूण संपत्ती 1241 कोटी रुपये आहे. या लोकसभेचे ते तिसरे सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत. यापूर्वीही ते दोनदा खासदार झाले आहेत.

प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी (Prabhakar Reddy Vemireddy) 

प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी हे VPR Mining Infra चे संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 716 कोटी रुपये आहे. तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. 18 व्या लोकसभेतील ते चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत.

सीएम रमेश (CM Ramesh) 

भाजप नेते सीएम रमेश हे यापूर्वी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील अनकापल्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते पूर्वी तेलुगु देसम पक्षाशी संबंधित होते. त्यांची एकूण संपत्ती 497 कोटी रुपये आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) 

ज्योतिरादित्य सिंधिया हे भारतीय राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांचे वडील आणि ते स्वतः काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिले. सध्या ते भाजपमध्ये आहेत. त्यांची एकूण संपत्ती 424 कोटी रुपये आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मागील मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री करण्यात आले आहे.

छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) 

छत्रपती शाहूजी महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांची संपत्ती 342 कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

श्रीभारत मथुकुमिली (Sribharat Mathukumilli) 

श्रीभारत मथुकुमिली विशाखापट्टणममधून तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 298 कोटी रुपये आहे. गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष आहेत.

हेमा मालिनी (Hema Malini)  

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. त्यांची संपत्ती 278 कोटी रुपये आहे.

डॉ प्रभा मल्लिकार्जुन (Dr Prabha Mallikarjun) 

डॉ. प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यांनी कर्नाटकातील देवनागिरी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या प्रभा मल्लिकार्जुन यांचा विवाह कर्नाटकातील मंत्री एसएस मल्लिकार्जुन यांच्याशी झाला आहे. त्यांची संपत्ती 241 कोटी रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या:

निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget