Paisa Jhala Motha : कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्स किती महत्वाचा? पाहा काय सांगतात इन्शुरन्स तज्ज्ञ
कुटंबातील कमावत्या व्यक्तीचा दुर्देवाने मृत्यू झाला तर आर्थिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी कुटुंबातील कमावत्या व्यक्तींच्या उत्पन्नाच्या दहा पट टर्म इन्शुरन्स घ्यावा, अशी माहिती जनरल इन्शुरन्स तज्ज्ञ सचिन शेडगे (Sachin Shedge ) यांनी दिली. एबीपी माझाच्या ( ABP majha ) 'पैसा झाला मोठा' (Paisa Jhala Motha) या कार्यक्रमात सचिन शेगडे बोलत होते.

Paisa Jhala Motha : "टर्म इन्शुरन्स (Term Insurance ) आपल्या पश्चात कुटुंबाचं सुरक्षा कवच असतो. वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट टर्म इन्शुरन्स घ्यावा. शिवाय टर्म इन्शुरन्समध्ये कर्जाची रक्कमही समाविष्ट असणे गरजेचे असते. टर्म इन्शुरन्समध्ये अपघात आणि दुर्धर आजार जोखीमही समाविष्ट करावी. एखाद्या कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे आहे. कुटंबप्रमुखाचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर कुटंबाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे टर्म इन्शुरन्स असणे खूप गरजेचे आहे. कुटंबातील कमावत्या व्यक्तीचा दुर्देवाने मृत्यू झाला तर आर्थिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी कुटुंबातील कमावत्या व्यक्तींच्या उत्पन्नाच्या दहा पट टर्म इन्शुरन्स घ्यावा, अशी माहिती जनरल इन्शुरन्स तज्ज्ञ सचिन शेडगे (Sachin Shedge ) यांनी दिली. एबीपी माझाच्या ( ABP majha ) 'पैसा झाला मोठा' (Paisa Jhala Motha) या कार्यक्रमात सचिन शेगडे बोलत होते.
गेल्या दोष वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थित वैद्यकीय विम्याचे महत्व पुढे आले आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या पैसा झाला मोठा या कार्यक्रमात सचिन शेडगे यांनी विम्याबद्दल माहिती दिली.
राष्ट्रीय परिवार आणि आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, भारतात लोकसंख्येच्या फक्त 27 टक्के लोकांकडेच वैद्यकीय विमा आहे. संबंधित 27 टक्क्यांपैकी 50 टक्के लोकांना कंपनीमुळे विमा कवच आहे. मागील दहा वर्षांत देशात सरासरी वैद्यकीय खर्तात 8.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात फक्त दहा टक्के लोकांकडे वैद्यकीय विमा आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय विमा घेतलेल्यांची संख्या फक्त 20 टक्के आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय विम्याविषयी जनजागृती झालेली नाही. परंतु, कोरोना काळात जनतेला विम्याचे महत्व समजले आहे. त्यामुळे आगामी काळात वैद्यकीय विमाधारकांची संख्या वाढेल, असा विश्वास सचिन शेडगे यांनी व्यक्त केला आहे.
विम्याशिवाय रस्त्यावर वाहन चालवणे गुन्हा!
वाहन विम्याविषयी बोलताना सचिन शेडगे म्हणाले, "कायद्याने वाहन विमा बंधनकारक आहे. सार्वजनिक रस्त्यावर कमीत कमी थर्ड पार्टी विमा असणं गरजेचं आहे. आपल्यामुळे इतरांना काय धोका झाला किंवा आपल्यामुळे अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर कोर्ट जी रक्कम देण्याचा आदेश देईल, ती रक्कम आपल्याला द्यावी लागते. त्यामुळे थर्ड पार्टी विमा असणे खूप गरजेचे आहे. शिवाय जुनं वाहन विकत घेत असताना आरसी बुकवर नवीन नाव नोंदणी झाल्यापासून 14 दिवासांत इन्शुरन्सवर नाव बदलणं गरजेचे आहे. विमा नसताना वाहन रस्त्यावर चालवणे गुन्हा आहे."
महत्वाच्या बातम्या
Car Insurance Tips : कार विमा दावा फेटाळला जाऊ नये असं वाटतंय, तर मग 'हे' वाचाच!
विमा पॉलिसीत मोबाईल क्रमांक टाकणे अनिवार्य, अपघातानंतर पोलिसांना करावी लागणार व्हिडिओग्राफी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
