एकेकाळी कपडे भांडी धुतली, आज मात्र अब्जावधींचा मालक, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपतीची संघर्षगाथा
मुकेश अंबानी हे जगातील 11व्या क्रमांकावरील श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर्स आहे. आता त्यांच्या संपत्तीची बरोबरी तैवानमधील उद्योगपती जेन्सेन हुआंगने (Jensen Huang) केलीय.
Success Story: ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index) जगातील 15 श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतीय अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे देखील नाव आहे. या यादीत मुकेश अंबानी 11व्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर्स आहे. 12व्या स्थानावर तैवानमधील एनव्हीडियाचे उद्योगपती जेन्सेन हुआंगचे (Jensen Huang) नाव आहे. त्यांची एखूण संपत्ती ही मुकेश अंबानींच्या बरोबरीची आहे. पण जेन्सेन हुआंग हे अब्जाधीश कसे झाले? त्यांनी करोडो रुपयांचं साम्राज्य नेमकं कसं उभं केलं. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
जेन्सेन हुआंगची एकूण संपत्ती इतकी वाढली कशी?
Nvidia च्या शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळं जेन्सेन हुआंग यांच्या संपत्तीत एवढी मोठी वाढ झाली आहे. जेन्सेन हुआंग हे या कंपनीचे अध्यक्ष आणि CEO आहेत. या कंपनीच्या निव्वळ संपत्तीत गेल्या 24 तासांत 1.08 अब्जची डॉलरची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 113 अब्ज झाली आहे. जी मुकेश अंबानींच्या बरोबरीची आहे. आशियातील सर्वात श्रीमंत 67 वर्षीय दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची बरोबरी जेन्सेन हुआंग यांनी वयाच्या 61 व्या वर्षी केली आहे. अलीकडेच
जेन्सेन हुआंग यांचा जन्म 1963 मध्ये
जेन्सेन हुआंग यांचा जन्म 1963 मध्ये तैवानमध्ये झाला. त्यांची सुरुवातीची वर्षे तैवानमध्ये घालवल्यानंतर त्याच्या पालकांनी 1973 मध्ये त्यांना अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर चांगल्या भविष्याच्या शोधात ते अमेरिकेत गेले. त्यांनी ओरेगॉन विद्यापीठातून बीटेक केले आणि त्यानंतर 1992 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. जेन्सन अतिशय सामान्य कुटुंबातून आले आहेत. म्हणूनच त्याने अमेरिकेत आपला खर्च भागवण्यासाठी वेटर म्हणूनही काम केले होते.
मिळेल ते काम मनापासून करा
113 अब्ज डॉलर्सचे मालक जेन्सेन हुआंग कोणत्याही कामाला लहान मानले नाही. त्यांनी जेवण देण्यापासून ते टॉयलेट साफ करणे आणि कपडे धुण्याचे, भांडी धुण्याचे काम केले आहे. यशासाठी हे महत्त्वाचे आहे की तुम्हाला जे काही काम मिळेल ते तुम्ही मनापासून करा. वेटर म्हणून काम करताना शिकलेल्या गोष्टी आजही तंत्रज्ञानाच्या वेगवान दुनियेत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे ते म्हणाले. जगातील 15 श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या जेन्सेन हुआंग यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, कोणतेही काम छोटे नसते.
Nvidia या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड वाढ
जेन्सेन हुआंग यांच्या Nvidia या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड वाढ झालीय. पाच दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग यांच्या नेट वर्थवर परिणाम झाला आहे. ते आता 113 अब्ज बिलियन डॉलरचे मालक झाले आहेत. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, वेटरसह हुआंग यांनी कपडे, भांडी आणि स्वच्छतागृहे देखील स्वच्छ केली होती.
महत्वाच्या बातम्या:
12 वी नंतर थेट शेती करण्याचा निर्णय, आज केळी पिकातून वर्षाला मिळवतोय 13 लाखांचा नफा