एक्स्प्लोर

मोठी बातमी! महिलांना मिळणार 50000 रुपये, काय आहे नेमकी योजना? कोणत्या महिला पात्र?

महिलांना आर्थिक सक्षम (Financial empowerment of women) करण्यासाठी सरकार विविध योजना (Various plans) सुरु करत आहे. या योजनांच्या माध्यमातून विविध राज्यांमधील सरकारे महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत.

Subhadra Yojana News : महिलांना आर्थिक सक्षम (Financial empowerment of women) करण्यासाठी सरकार विविध योजना (Various plans) सुरु करत आहे. या योजनांच्या माध्यमातून विविध राज्यांमधील सरकारे महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत. अशातच ओडिसा सरकारनं एक नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सुभद्रा योजना (Subhadra Yojana) असं या योजनेचं नाव आहे. जाणून घेऊयात या योदनेबद्दल सविस्तर माहिती. 

भारत सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते. यातील अनेक योजना महिलांना थेट आर्थिक लाभ देण्यासाठी आणल्या जातात. केवळ केंद्र सरकारच नाही तर भारतातील सर्व राज्यांतील राज्य सरकारेही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणतात. अलीकडेच ओडिशा सरकारने राज्यातील महिलांसाठी सुभद्रा योजनाही जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 50000 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिला नेमका कसा अर्ज करु शकतात? यासाठी पात्रता काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

कसे मिळणार महिलांना 50000 रुपये ?

ओडिशा सरकारने सुरू केलेल्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना 50000 रुपये दिले जाणार आहेत. ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी 10000 हजार रुपये दिले जातील. सरकारच्या या योजनेत महिलांना प्रत्येकी 5000 रुपयांच्या दोन हप्त्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 5 वर्षात 50 हजार रुपये दिले जातील. या योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

'या' महिलांना लाभ मिळणार नाही

सुभद्रा योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मूळ ओडिशा राज्यातील असणेही आवश्यक आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात कोणीतरी सरकारी नोकरी करत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच 60 वर्षाच्या पुढच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर एखादी महिला आधीच राज्याच्या कोणत्याही योजनेंतर्गत लाभ घेत असेल. त्यानंतरही त्याला सुभद्रा योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

कधी सुरु होणार योजना?

ओडिशा सरकारने सुरू केलेली सुभद्रा योजना 17 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होणार आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे हप्ते वर्षातून दोन वेळा देणार आहे. पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिला जाईल, तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल.

महत्वाच्या बातम्या:

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना नेमकी काय?  राज्य सरकार 14 हजार कोटींचं अनुदान देणार, 44 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget