Share Market Today : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 60388 तर निफ्टी 18000 पार
Share Market Opening Bell : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार किंचित वाढीसह उघडला. निफ्टी 18000 च्या वर उघडला, पण नंतर गडगडला.
Stock Market Opening Bell : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार (Share Market) वाढीसह उघडला. सेन्सेक्स (Sensex) 35 अंकांच्या वाढीसह 60388 वर उघडला, तर निफ्टी 16 अंकांच्या वाढीसह 18008 वर आणि बँक निफ्टी 41 (Nifty 50) अंकांच्या वाढीसह 42649 वर उघडला. सुरुवातीच्या सत्रात निफ्टी किंचित वाढीसह उघडला, पण नंतर 1800 च्या खाली घसरला. पॉवरग्रीड, आयटीसी, नेस्ले इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, बजाज फायनान्स या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सोने 25 डॉलरने घसरले असून 1840 डॉलरवर व्यवहार करत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 82.55 वर उघडला आहे.
धातू, ऊर्जा आणि फार्मा शेअर्स तेजीत
आज शेअर बाजारातील एफएमसीजी (FMCG), धातू, ऊर्जा आणि फार्मा शेअर्स तेजीत व्यवहार करत आहे. याशिवाय इतर सर्व क्षेत्रांतील शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बँकिंग, ऑटो, आयटी, क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकीं 15 शेअर्स वाढीसह तर, 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह तर 22 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे.
आज कमाई करणारे शेअर्स
शेअर बाजारात आज कमाई करणाऱ्या शेअर्समध्ये आईटीसी 1.05 टक्के, रिलायन्स 1.03 टक्के, नेस्ले 0.71 टक्के, एचयूएल 0.64 टक्के, लार्सन 0.61 टक्के, सन फार्मा 0.60 टक्के, पावर ग्रीड 0.50 टक्के, टाटा स्टील 0.43 टक्के, टायटन 0.37 टक्के, एचडीएफसी 0.28 टक्के तेजीत व्यवहार करत आहेत.
'या' शेअर्समध्ये घसरण
बाजारात आज घसरणीसह व्यवहार करणाऱ्या शेअर्समध्ये टीसीएस 0.92 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.81 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.76 टक्के, अॅक्सिस बँक 0.54 टक्के, इंडसइंड बैंक 0.48 टक्के, टेक महिंद्रा 0.45 टक्के, बजाज फाइनँस 0.32 टक्के, इन्फोसिस 0.23 टक्के, कोटक महिंद्रा 0.20 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.10 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.
जागतिक बाजारामुळे विक्रीचा दबाव
देशांतर्गत बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार नफा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे व्याजदरात झालेली वाढ आणि भौगोलिक-राजकीय परिस्थिती यांच्यामुळे बाजारावर विक्रीचा दबाव आहे. आगामी काळात विक्री आणखी वाढू शकते.
जागतिक बाजारामुळे विक्रीचा दबाव
देशांतर्गत बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार नफा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे व्याजदरात झालेली वाढ आणि भौगोलिक-राजकीय परिस्थिती यांच्यामुळे बाजारावर विक्रीचा दबाव आहे. आगामी काळात विक्री आणखी वाढू शकते.