(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stock Market : शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 57.500 तर निफ्टीने 17100 चा टप्पा ओलांडला
Stock Market : आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 57,000 आणि निफ्टी 17,000 पार करण्यात यशस्वी ठरला आहे.
Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी हा आठवडा खूप चांगला गेला आहे. चालू आठवड्यात देशी-विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजारात प्रचंड वाढ दिसून आली. आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला.
सेन्सेक्स 57,000 आणि निफ्टी 17,000 पार करण्यात यशस्वी ठरला आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 712 अंकांच्या वाढीसह 57,570 वर बंद झाला तर निफ्टी 228 अंकांच्या वाढीसह 17,158 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात आज सर्वच शेअरर्स मध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. आयटी, फार्मा, एनर्जी, बँकिंग, मेटल, ऑटो, बँकिंग, एफएमसीजी, रिअल इस्टेट या सर्व क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 43 शेअर्समध्ये आज वाढ झाली. तर सात शेअर्समध्ये घसरण झाली. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्समध्ये वाढ झाली तर चार शेअर्शमध्ये घसरण झाली.
वाढलेले शेअर्स
टाटा स्टील 7.42 टक्के, सन फार्मा 5.62 टक्के, एचडीएफसी 2.47 टक्के, एशियन पेंट्स 2.38 टक्के, इंडसइंड बँक 2.24 टक्के, रिलायन्स 1.99 टक्के, विप्रो 1.92 टक्के, बजाज फायनान्स 1.88 टक्के आणि क्लोज ऑफ इंडियामध्ये .75 टक्के वाढ झाली.
घसरलेले शेशर्स
डॉ रेड्डीज 3.98 टक्के, कोटक महिंद्रा 0.99 टक्के, एसबीआय 0.77 टक्के, दिवीज लॅब 0.47 टक्के, अॅक्सिस बँक 0.16 टक्के, आयटीसी 0.13 टक्के, पॉवर ग्रिड 0.12 टक्के आणि अदानी पोर्ट्स 0.10 टक्के एकत्र घसरले.
शेअर बाजारात आज जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. कालपासून दाखवलेली तेजी आजही कायम आहे. भारतीय बाजाराला जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. आशियाई बाजारांत तेजी असून काल अमेरिकन बाजारांतही चौफेर तेजी दिसून आली. यूएस बाजारांमध्ये डाऊ जोन्स, नॅस्डॅक कंपोझिट आणि S&P 500 निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले होते.
आज देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीस BSE 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी म्हणजे 0.70 टक्क्यांनी वाढून 57,258.13 वर उघडला. तर NSE चा निफ्टी 49.90 अंकांनी वाढून 17,079.50 वर उघडला.