(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stock Market Opening : शेअर मार्केटच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची जोरदार उसळी, निफ्टीचीही तेजीत सुरूवात
आज सकाळपासूनच एसजीएक्स निफ्टीमध्ये जोरदार वाढ झालेली पाहायला मिळाली. निफ्टीची पातळी पाहिली तर सकाळी 8 वाजून 55 मिनिटाला 125 अंक वरती म्हणजे .72 टक्के वाढून 17350 वर ट्रेंड करत होता.
Stock Market Opening: आज शेअर मार्केटची (stock market ) सुरूवात चांगली झाली. सुरूवातीलाच सेन्सेक्समध्ये (sensex) मोठी वाढ झाली. मार्केट सुरू होतानाच सेन्सेक्स 601.8 अंकांच्या वाढीसह 58,235.45 वर पोहोचला. यासोबतच निफ्टी ( nifty) 9 वाजून 17 मिनिटाला 182.70 अंकांनी म्हणजेच 1.06 टक्क्यांच्या वाढीसह 17,359.40 वर पोहोचला होता.
निफ्टीचे वाढणारे आणि कमी होणारे शेअर्स
निफ्टीमधील वाढणारे शेअर पाहिले असता 50 मधील 46 शेअर्स मोठ्या वाढीसह ट्रेंडिगमध्ये आहेत. सर्वात वाढलेला शेअर्स विप्रो 2.90 टक्क्यांनी वरती आहे. एचसीएल टेक 2.27 टक्क्यांनी वाढवला आहे. इंफोसिस मध्ये 2.26 टक्यांनी वाढ झाली आहे. त्यासोबतच महिंद्रा आणि ओएनजीसीसुद्धा चांगले ट्रेंड करत आहेत. तर पडणाऱ्या शेअर्समध्ये एनटीपीसी, कोल इंडिया, हिंडोल्को आणि एचडीएफसी लाईफ मध्ये 0.20-0.04 टक्के कमजोरी दाखवत आहे.
प्री-ओपनिंग सेशनमधून असे संकेत मिळाले?
आज मार्केटचे प्री-ओपनिंग सेशन पाहिले तर त्यामध्ये बीएसईचा सेन्सेक्स 473.76 अंक म्हणजे 0.82 टक्यांच्या वाढीसह 58,107.41 पर पोहोचला. तर निफ्टी- फिफ्टी 138 अंकांसह 0.81 टक्यांनी वाढला. त्यामुळे निफ्टी 17315 च्या वर गेल्याचा प्री-ओपनिंग सेशनमध्ये पाहायला मिळाला. त्यामधूनच संकेत मिळाले की, निफ्टीची सुरूवातच आज 17300 च्या वरून होईल.
SGX Nifty मध्ये जोरदार वाढ
आज सकाळपासूनच एसजीएक्स निफ्टीमध्ये जोरदार वाढ झालेली पाहायला मिळाली. निफ्टीची पातळी पाहिली तर सकाळी 8 वाजून 55 मिनिटाला 125 अंक वरती म्हणजे .72 टक्के वाढून 17350 वर ट्रेंड करत होता.
आशियाई मार्केटमध्ये चांलगी वाढ
आस सकाळी आशियाई मार्केटमध्ये जोरदार वाढ झालेली पाहायला मिळाली. निक्केई, हैंगसेग आणि शंघाईसह काही इंडेक्स वाढीच्या संकेतासह व्यवहार करताना दिसले. जपानचा निक्केई 318 अंक म्हणजे 1.12 टक्यांच्या वाढीसह ट्रेंड करत होता. हाँगकाँगचा हैंगसेंग 13.31 अकं म्हणजे 0.06 टक्क्यांनी वरती होता. तर शंघाईच्या कम्पोजिटमध्ये 0.29 टक्यांची वाढ नोदविली. आशीयाई मार्केटमध्ये सिंगापूरचा स्ट्रेट टाईम्स खाली पडलेला पाहायला मिळाला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या
रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर; व्याज दर जैसे थे!