एक्स्प्लोर

RBI च्या कारवाईनंतर PayTMला जाग, पण शेअर मार्केट सुरु होताच लोअर सर्किट लागलं, शेअर्समध्ये घसरण

Paytm Payments Bank Ltd : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम बँकेवर (PayTM Bank) कारवाई केली होती. त्यानंतर पेटीएमने (Paytm Payments Bank Ltd) तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली.

Paytm Payments Bank Ltd : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम बँकेवर (PayTM Bank) कारवाई केली होती. त्यानंतर पेटीएमने (Paytm Payments Bank Ltd) तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिक स्पष्ट केली. पण आज शेअर बाजार उघडल्यानंतर पेटीएमला लोअर सर्किट लागलं आहे. पेटीएमचा शेअर 20 टक्क्यांनी Paytm Share कोसळला आहे.  

आरबीआयने पेटीएम बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली. 31 जानेवारी रोजी आरबीआयकडून पेटीएमवर कारवाई करण्यात आली.  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, सिस्टिम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या काही रिपोर्टमध्ये कंपनीने सातत्याने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले. त्याशिवाय, पेटीएम बँकेशी संबंधित आणखी काही गंभीर बाबी समोर आल्या असून भविष्यात आणखी आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही आरबीआयने केले आहे. 

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमचं मोठं पाऊल, नियमांचे पालन करण्यास सुरुवात

पेटीएम पेमेंट बँकेवर बुधवारी आरबीआयने कारवाई केली होती. त्यानंतर पेटीएमकडून मोठी पावले उचलण्यात आली आहेत. आरबीआयच्या नियमांचे पालन करण्यास तातडीनं पावलं टाकण्यास पेटीएमने सुरुवात केली आहे. बचत खाते, फास्टॅग, वॉलेट, एनसीएमसी अकाऊंट्समधील ठेवींवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पेटीएम पेमेंट बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

300-500 कोटींचा फटका - 

खातेदार आपल्या अकाऊंटमध्ये असलेल्या ठेवी वापरू शकतात. पेटीएमकडून इतर बँकांच्या मार्फत आपले इतर वित्तीय सेवा सुरुच ठेवल्या जाणार आहेत. कर्ज वितरण, विमा वितरण आणि इक्विटी ब्रोकिंगसारख्या वित्तीय सेवांना फटका बसणार नसल्याचं पेटीएमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निर्बंधांमुळे पेटीएम पेमेंट बँकेला जवळपास 300-500 कोटी रुपयांचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. 

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण 

हंगामी अर्थसंकल्पाआधी भारतीय भांडवली बाजारात संथ सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 40 अंकांनी घसरला तर निफ्टी 1 अंकांवर वधारला आहे. आरबीआयकडून पेटीएमवर  केलेल्या कारवाईनंतर समभागात मोठी घसरण झाली आहे. पेटीएमला लोअर सर्किट लागलं आहे. पेटीएमचा शेअर 20 टक्क्यांनी कोसळले आहेत. पेटीएमचा समभाग थेट 609 वर आला आहे. बुधवारी पेटीएमचा शेअर 761 वर बंद झाला होता. 

आणखी वाचा :

RBI On PayTM Bank : आरबीआयचा PAYTM बँकेला धक्का, नवीन ग्राहक जोडण्यास मनाई, जुन्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget