नवीन व्यवसाय सुरु करायचाय? फक्त 10 हजार रुपये खर्च करा, मोठा नफा मिळवा
तुम्हाला जर कमी भांडवलात मोठा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही बुक स्टेशनरीचा (Book stationery) व्यवसाय सुरु करु शकता. या व्यवसायातून तुम्ही मोठा नफा मिळवू शकता.
Business Idea : अलीकडच्या काळात अनेक तरुण तरुणी नोकरीच्या (Job) मागे न लागता व्यवसाय करत आहेत. व्यवसायाच्या (Business) माध्यमातून चांगला नफा (Profit) मिळवत आहेत. आज सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळं या स्पर्धेत टिकायचं असेल तर एक चांगला दर्जा निर्माण करणं गरजेचं आहे. दरम्यान, तुम्हाला जर कमी भांडवलात मोठा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही बुक स्टेशनरीचा (Book stationery) व्यवसाय सुरु करु शकता. या व्यवसायातून तुम्ही मोठा नफा मिळवू शकता.
सुरुवातीला एखादा व्यवसाय सुरु करताना नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा? असा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो. सुरुवातीला कोणताही व्यवसाय सुरु करताना चांगल्या भांडवलाची गरज असते. दरम्यान, कमी भांडवलात देखील तुम्ही चांगला व्यवसाय सुरु करु शकता. असाच एक व्यवसाय म्हणजे बुक स्टेशनरीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरु करुन तुम्ही 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळवू शकता.
कमी भांडवलात अधिक नफा
तुम्हाला शाळा-कॉलेजच्या आसपास असणाऱ्या बुक स्टेशनरीच्या दुकानांमध्ये कायम गर्दी पाहायला मिळते. कारण सध्या स्टेशनरी वस्तूंना खूप मोठी मागणी आहे. त्यामुळं तुम्ही सुरुवातीला फक्त 10 हजार रुपयांची गुंतवणूक करुन हा व्यवसाय सुरु करु शकता. या व्यवसायातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
कमी भांडवलात अधिक नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.
प्रथम शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट अंतर्गत नोंदणी करा
बुक स्टेशनरीच्या दुकानातील वस्तूंना मोठी मागणी आहे. यामध्ये पेन पेन्सील, कागद, नोटपॅड, ग्रिटिंग कार्ड, भेट कार्ड, वही, पुस्तक अशा अनेक वस्तुंच्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रथम तुम्हाला 'शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट' अंतर्गत नोंदणी करणं गरजेचं आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्ही 400 ते 500 चौरस मीटर जागेत तुम्ही व्यवसाय सुरु करु शकता. अत्यंत कमी गुंतवणुकीत तुमचा हा व्यवसाय सुरु होतो. तुमच्याकडे येणाऱ्या बजेटनुसार तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करा.
जागेची निवड
बुक स्टेशनरी दुकान उघडताना महत्वाचा मुद्दा म्हणजे जागेची निवड. तुम्ही व्यवसाय कुठे सुरु करता हे खूप महत्वाचं आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या जवळ तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. तुम्ही जर तुमच्या दुकानात ब्रँडेंड वस्तू विक्रीसाठी ठेवल्या तर तुम्हाला यातून 40 ते 50 टक्क्यांचा नफा मिळवता येतो. हा व्यवसाय करत असताना तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मार्केटींग करता आलं पाहिजे. यासाठी तुमच्या दुकानाचे नाव टाकून कार्ड तयार करावी लागतील. शाळांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन यासंदर्भातील माहिती तुम्हाला द्यावी लागेल. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करु शकता.
महत्वाच्या बातम्या: