एक्स्प्लोर

Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् अखेरची तारीख

Sovereign Gold Bond : 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान रिझर्व्ह बँक स्वस्तात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत स्वस्तात सोनं खरेदी करता येतं.

Sovereign Gold Bond Scheme 2023-24 (Series II): रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) लोकांना स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. हे सोनं तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकता. ग्राहकांना सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत (Sovereign Gold Bond) स्वस्तात सोनं खरेदी करता येतं. RBI नं आर्थिक वर्ष 2023-24 साठी सॉव्हरिन गोल्ड बाँडची दुसरी सीरिज जारी केली आहे. 

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेंतर्गत स्वस्त सोनं खरेदीसाठी पाच दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीम 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ग्राहकांना सॉव्हरिन गोल्ड बाँड खरेदी करता येतं. सॉवरेन  गोल्ड बाँडमध्ये, गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते. 

सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीम इश्यू प्राईज

8 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेनं सॉव्हरिन गोल्ड बाँडच्या दुसऱ्या सीरिजसाठी इश्यू किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. तुम्ही प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन 99.9 टक्के शुद्ध सोनं खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदी केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाईल. यामुळे किंमत कमी होऊन 5,873 रुपये प्रति ग्रॅम होईल.

किती व्याज मिळेल?

या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केल्यास, लोकांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर 2.50 टक्के व्याज दिलं जाईल. सॉवरेन गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षांचा आहे आणि पाच वर्षांनंतर, ग्राहकांना निवड रद्द करण्याचा पर्याय असेल.

सॉव्हरिन गोल्ड बाँड अंतर्गत सोनं कुठे खरेदी करता येणार? 

जर तुम्हाला या योजनेत बाँड खरेदी करायचे असतील तर गुंतवणूकदार हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्टऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (Stock Exchanges), NSE आणि BSE च्या माध्यमातून खरेदी करु शकता. दरम्यान, लहान वित्त बँक आणि पेमेंट बँकेत याची विक्री होत नाही. 

किती रक्कमेची गुंतवणूक शक्य? 

जर आपण यात जास्तीत जास्त गुंतवणूकीबद्दल बोललो, तर आपण 4 किलो सोन्याचे रोखे खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त ट्रस्ट किंवा एखाद्या संस्थेबाबत बोलायचं झालं तर ते 20 किग्रॅपर्यंत बाँड खरेदी करु शकतात. बाँडची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. एसोसिएशन लि. (IBJA) द्वारे देण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी क्लोजिंग प्राइज आधारावर निश्चित केली आहे. 

सॉव्हरिन गोल्ड बाँडचे फायदे 

  • या योजनेत गुतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दरानं व्याज मिळतं. 
  • या योजनेत कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळते. 
  • या योजनेंतर्गत सोने खरेदीसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही.
  • या व्यतिरिक्त, आपण हे कोलॅटरल म्हणून देखील वापरू शकतो. 
  • आपण स्टॉक एक्सचेंजद्वारे ट्रेड करू शकता.
  • याव्यतिरिक्त या बाँड्सच्या सिक्योरिटीबाबतही गुंतवणूकदारांना टेन्शन घेण्याची गरज नाही. 

सॉव्हरिन गोल्ड बाँड म्हणजे काय? 

सॉव्हरिन गोल्ड बाँड हा एक सरकारी बाँड असतो. ही योजना आरबीआयच्या वतीनं जारी केली जाते. सरकानं ही योजना 2015 मध्ये सुरु केली होती. यामध्ये सोन्याच्या वजनाच्या रुपात खरेदी करु शकतो. जर हे बाँड 5 ग्रॅमचे असतील तर याची किंमत 5 ग्रॅम सोन्याच्या बरोबरीनं असते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण
Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget