चांदीच्या दरात विक्रमी वाढ, चांदी 1 लाखाचा टप्पा गाठणार? सध्या नेमका किती दर?
दिल्लीत (Delhi) चांदीच्या दरानं (Silver Rate) विक्रमी पातळी गाठली आहे. लवकरच चांदीचा दर 1 लाख रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे.
Silver Rate News : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोन्याची खरेदी करण परवड नाही. दरात वाढ झाल्यानं खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. दरम्यान, दिल्लीत (Delhi) चांदीच्या दरानं (Silver Rate) विक्रमी पातळी गाठली आहे. लवकरच चांदीचा दर 1 लाख रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसात चांदीच्या दरात विक्रमी 5,100 रुपयांची वाढ झालीय.
लवकरच चांदी गाठणार 1 लाखाचा टप्पा
दिल्लीत चांदी सातत्याने विक्रम पातळी गाठत आहे. सलग तीन दिवसांत चांदीच्या दरात प्रतिकिलो 5100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतिकिलो चांदीचा दर हा 97 हजार रुपयांवर गेला आहे. चांदीच्या दरानं विक्रमी पातळी गाठलीय. जाणकारांचे म्हणणे आहे की, हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर दिल्लीत चांदीची किंमत लवकरच 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
परदेशी बाजारात चांदीच्या दरात घसरण
दिल्लीत पहिल्यांदाच चांदीचा दर हा 97 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे सलग तीन दिवसांत चांदीच्या दरात 5100 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, चांदीची किंमत अशीच वाढत राहिल्यास दिल्लीतील चांदीचा भाव या आठवड्यात एक लाख रुपयांच्या पुढे जाईल. दुसरीकडे, चांदीच्या दरानेही बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये विक्रमी उच्चांक गाठला आहे. संध्याकाळी परदेशी बाजारात चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी चांदीच्या दरात 1,150 रुपयांची वाढ दिसून आली आहे. चांदीचा दर हा 97,100 रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे. तर एक दिवसापूर्वी चांदीच्या दरात 3100 रुपयांची जोरदार वाढ झाली होती. सोमवारीही चांदीच्या दरात 1050 रुपयांची वाढ दिसून आली. म्हणजेच तीन दिवसांत चांदीच्या दरात 5,100 रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ
दिल्लीत सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 250 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत सोन्याचा भाव 73,200 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. मात्र, मंगळवारी सोन्याच्या दरात 130 रुपयांची वाढ दिसून आली. तर सोमवारी भावात 220 रुपयांनी वाढ झाली होती. म्हणजेच तीन दिवसांत सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: