(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market: तेजीसह शेअर बाजारातील व्यवहार सुरू, मात्र अस्थिरता राहण्याची शक्यता
Share Market Updates : शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली असली तरी बाजारात दिवसभर अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.
Share Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह सुरू झाले. मात्र, आज दिवसभर शेअर बाजारात अस्थिर वातावरण असल्याची शक्यता आहे. जागतिक शेअर बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. आशियाई शेअर बाजारात तेजी दिसत आहे. तर, जपानचा शेअर बाजार आज बंद आहे.
शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 168 अंकांनी वधारत 58,030 अंकावर व्यवहार सुरू केला. तर, निफ्टी 42.50 वधारला. सुरुवातीच्या कलानुसार आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसत आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 176 अंकाची घसरण झाली होती. तर, निफ्टी 49 अंकांनी घसरला होता.
निफ्टीत काय ?
निफ्टी 50 मधील 25 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, 25 शेअरचे दर घसरले आहेत. बँक निफ्टीत 100 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 36,325 अंकांवर व्यवहार करत आहे.
बाजारातील क्षेत्रांची परिस्थिती काय?
बँक, एफएमसीजी, वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक उद्योग आणि खासगी बँकांचे क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. मेटल शेअरमध्ये सर्वाधिक 1.91 टक्क्यांची उसळण दिसत आहे. तर, मीडिया क्षेत्रातील शेअरमध्ये 1.5 टक्क्यांची उसळण आहे. ऑटो शेअरमध्ये 0.74 टक्क्यांची उसळण दिसत आहे.
हे शेअर वधारले
हिंदाल्को 3.52 टक्के, विप्रो 2.3 टक्के, मारुती 2.25 टक्क्यांनी वधारला आहे. ओएनजीसीच्या शेअरमध्ये 2.06 टक्के आणि इन्फोसिसमध्ये 1.5 टक्के उसळण दिसून आली आहे.
या शेअरमध्ये घसरण
एशियन पेंट्स 1.65 टक्के, ग्रासिम 1.58 टक्के आणि पॉवरग्रिडमध्ये 1.18 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. कोटक बँकमध्ये 1.05 टक्के आणि ब्रिटानियामध्ये 1.03 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: