Share Market Updates: शेअर बाजारात आजही अस्थिरता? नफावसुली कायम राहण्याचे संकेत
Share Market Updates: शेअर बाजारात आजही नफावसुली दिसण्याचे संकेत दिसत आहेत. तेजीसह सुरू झालेल्या बाजारात विक्रीमुळे घसरण सुरू झाली आहे.
Share Market Updates: भारतीय शेअर बाजारातील व्यवहारात (Share Market) आजही अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे. प्री-ओपनिंग सत्रात (Pre Opening Session), शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बाजारात तेजी दिसून आली. त्यानंतर पुन्हा एकदा विक्रीचा जोर वाढल्याने सेन्सेक्समध्ये (Sensex) घसरण दिसून आली. आशियाई शेअर बाजार (Asian Share Market) आणि एसजीक्स निफ्टीत (SGX Nifty) तेजी दिसून आल्याने भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
आज सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 189.93 अंकांच्या तेजीसह 61,257 अंकांवर खुला झाला. तर, एनएसई निफ्टीचा निर्देशांक 89.70 अंकांच्या तेजीसह 18,288.80 खुला झाला. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढू लागल्याने निर्देशांकात घसरण दिसून आली. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 109 अंकांच्या घसरणीसह 60,958.12 अंकावर व्यवहार होता. तर, निफ्टी निर्देशांक 35 अंकांच्या घसरणीसह 18,163.80 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 7 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, 23 कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. निफ्टी 50 मधील 11 कंपन्यांचे शेअर दर वधारले असून 39 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
निफ्टी निर्देशांकात, सनफार्माच्या शेअर दरात 1.84 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, कोटक बँकेच्या शेअर दरात 0.68 टक्के, अपोलो हॉस्पिटलच्या शेअर दरात 0.55 टक्के, इन्फोसिमध्ये 0.50 टक्के, भारती एअरटेलमध्ये 0.46 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, बजाज फिनसर्व्हमध्ये 2.18 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. युपीएलमध्ये 2.07 टक्के, अॅक्सिस बँकेत 1.95 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 1.80 टक्के आणि बीपीसीएलच्या शेअर दरात 1.71 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
शेअर बाजारात (Share Market) मागील दोन दिवसांपासून विक्रीचा सपाटा सुरू असून बाजारात घसरण दिसून येते आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकात एक टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली. आशियाई शेअर बाजारातील (Asian Share Market) घसरण आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी (HDFC) आदी कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला.
बुधवारी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 635.05 अंकांच्या घसरणीसह 61,067.24 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 186.20 अंकांच्या घसरणीसह 18,199.10 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकात इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, सन फार्मा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, नेस्ले, विप्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स वधारले.