शेअर बाजारात पडझड पण HP Adhesivesची 16 टक्के प्रीमियमने लिस्टींग
HP Adhesives Shares Update: HP Adhesives चा शेअर आज बाजारात प्रीमियम दरावर लिस्ट झाला.
HP Adhesives Listing : शेअर बाजारात पडझड सुरू असताना दुसरीकडे HP Adhesivesने शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. शेअर बाजारात 16 टक्के प्रीमियम दराने लिस्ट झाला आहे. पहिल्याच दिवसापासून या शेअरने गुंतवणुकदारांना नफा मिळवून देण्यास सुरुवात केली आहे. HP Adhesives आज शेअर बाजारात एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध (लिस्ट) झाला.
HP Adhesives चा शेअर किती रुपयांना लिस्टिंग झाला?
HP Adhesives चा शेअर एनएसईवर 315 रुपयांवर, तर बीएसईवर 319 रुपयांवर लिस्ट झाला. लिस्ट झाल्यानंतर शेअर दर 334 रुपयांवर पोहचला. शेअर बाजारात पडझड होत असताना या शेअरने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून दिली.
HP Adhesives चा आयपीओ 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर खुला होता. कंपनीने आयपीओमध्ये शेअर प्राइस बॅण्ड 262-274 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आला होता. HP Adhesives च्या आयपीओमध्ये गुंतवणुकदारांना कमीत कमी एक लॉट आणि अधिक अधिकाधिक 14 लॉटसाठी बोली लावली होती. एका लॉटमध्ये गुंतवणुकदारांना 50 शेअर देण्यात आले होते.
दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला. तर, एनएसईचा 50 स्टॉकचा इंडेक्स निफ्टी 143.10 अंकांनी घसरला. शेअर बाजार सुरू होताच घसरण झाल्याने गुंतवणुकदरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
प्री-ओपनिंगमध्ये बाजार कसा होता
आज, बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 175.98 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 56,948.33 वर व्यवहार करताना दिसत आहे. निफ्टी 37 अंकांच्या घसरणीसह 16937.80 वर व्यवहार करताना दिसत आहे. याशिवाय SGX निफ्टीमध्येही 65 अंकांची घसरण झाली. आज बाजार स्थिरावण्यापूर्वीच बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Government Scheme: या योजनेत खातं सुरू कराल तर पत्नीला मिळतील दरमहा 44,793 रुपये
- फुटवेअर बनवणाऱ्या 'या' कंपनीचा आयपीओ येतोय..जाणून घ्या सविस्तर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha