Share Market Opening : शेअर बाजारात किंचित तेजी, IT शेअर्सच्या खरेदीवर जोर
Share Market Opening Bell : गुरुवारी भारतीय शेअर बाजारात आयटी शेअर्सच्या खरेदीवर गुंतवणूकदारांचा जोर पाहायला मिळत आहे.
Stock Market Opening Bell : आज भारतीय शेअर बाजार (Share Market) किंचित तेजीसह व्यवहार सुरू झाले. BSE सेन्सेक्स 10 अंकांच्या वाढीसह 60,115 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 7 अंकांच्या वाढीसह 17,902 अंकांवर उघडला. सध्या सेन्सेक्स 33 आणि निफ्टी 22 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
आज शेअर बाजारात आयटी शेअर्सच्या खरेदीवर गुंतवणूकदारांचा जोर पाहायला मिळत आहे. तसेच ऑटो, बँकिंग, पीएसयू बँक एनर्जी, इन्फ्रा सेक्टरच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. तर फार्मा, एनर्जी एफएमसीजी, मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे.
आज सकाळी सेन्सेक्स 23 अंकांनी घसरून 60,083 वर उघडला आणि व्यवहाराला सुरुवात केली, तर निफ्टी 25 अंकांनी वाढून 17,921 वर उघडला आणि व्यवहाराला सुरुवात केली. गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत खरेदी करण्यास सुरुवात केली. सकाळी सेन्सेक्स 128 अंकांनी 60,234 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 28 अंकांनी वाढून 17,924 वर होता.
'या' शेअर्समध्ये तेजी
आज बाजारात HCL टेक 1.35 टक्के, टायटन 1.12 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.78 टक्के, लार्सन अँड टर्बो 0.74 टक्के, बजाज फिनसर्व 0.69 टक्के, नेस्ले 0.62 टक्के, विप्रो 0.60 टक्क्यांच्या तेजी व्यवहार करत आहेत.
'या' शेअर्समध्ये घसरण
आज भारतीय शेअर बाजारात एशियन पेंट्सचे शेअर्स 1.05 टक्क्यांनी, टाटा स्टील 0.72 टक्क्यांनी, अॅक्सिस बँक 0.68 टक्क्यांनी, ICICI बँक 0.59 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा 0.35 टक्क्यांनी, SBI 0.30 टक्क्यांनी, पॉवर ग्रिड 0.19 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
चलनवाढीचा दर आणि आयआयपीच्या आकडेवारीवर लक्ष
आज डिसेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचे आकडे जाहीर केले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरणात व्याजदरांबाबत काय निर्णय घेते हे किरकोळ महागाई दरावर अवलंबून असेल.
बुधवारी शेअर बाजारात मोठी अस्थिरता
भारतीय शेअर बाजारात मागील दोन दिवस घसरणीसह सुरुवात झाली होती. मात्र, आज तुरळक तेजीने सत्राची सुरुवात झाली, ही सकारात्मक बाब आहे. बुधवारी बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र गुरुवारी बाजार सुरु झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला, त्यामुळे बाजारात वाढ दिसून आली. आज जागतिक बाजारातही तेजी पाहायला मिळाली. याचा देशांतर्गत गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
EPFO Update : UAN नंबरशिवाय PF अकाऊंटवरून काढता येतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया