एक्स्प्लोर

Share Market Opening: शेअर बाजाराची सावध सुरुवात; सेन्सेक्स, निफ्टीत किंचीत घसरण, आजही बाजारात अस्थिरता?

Share Market Opening : भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात सपाट झाली. बाजारात आजही अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.

Share Market Opening: शेअर बाजारातील व्यवहाराची आज सावधपणे सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात होण्याआधी आशियाई बाजारात (Asian Share Market) संमिश्र ट्रेंड असल्याचे दिसून आले. त्याचा फारसा फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला (India Share Market) नाही. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सपाट झाली. बाजार आजही अस्थिर राहण्याची शक्यता आहे. 

आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा खरेदीचा जोर दिसण्याचे संकेत दिसत होते. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात संमिश्र झाली. सेन्सेक्समध्ये किंचीत घसरण दिसून आली. बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 23 अंकांनी घसरत 57,403 अंकावर आणि निफ्टी 8 अंकांनी वधारत 17,102 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 173 अंकांच्या घसरणीसह 57,253.84 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 43 अंकांच्या घसरणीसह 17,050.60  अंकांवर व्यवहार करत होता.  

आज बँक निफ्टीत घसरण दिसून आली. आयटी निर्देशांकातही 0.4 टक्क्यांची घसरण दिसून आली. मेटल शेअर्सवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम दिसत असून घसरण सुरू आहे. मीडिया, फार्मा, रियल्टी, हेल्थकेअर आणि ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. 

निफ्टीत, ओएनजीसीच्या शेअर दरात 5.28 टक्के, एनटीपीसीमध्ये 2.04 टक्के, अपोलो रुग्णालयात 1.86 टक्के, कोल इंडियात 1.60 टक्के आणि बीपीसीएलमध्ये 1.35 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, सिप्ला, रिलायन्स इंडस्ट्रीज, यूपीएल आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. 

हिंदाल्को, टायटन, जेएसडब्लू स्टील, मारुती, अदानी एंटरप्राइजेस आदी शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. इंडसइंड बँकेतही एक टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 

शुक्रवारी बाजारात तेजी 

शुक्रवारी, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांची (RBI Hikes Repo Rate) वाढ केल्यानंतरही भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर बँकिंग शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1016.96 अंकांनी वधारत 57,426.92 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 276.20 अंकांच्या तेजीसह 17,094.30 अंकांवर बंद झाला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime Case Swargate : 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर अत्याचार!  पुण्यातील घटनेची A टू Z कहाणीPune Crime News :  पुणे हादरलं! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार : ABP MajhaUjjwal Nikam : Dhananjay Deshmukh यांनी उपोषण थांबवावं, उज्ज्वल निकम यांचं आवाहन ABP MAJHAUjjwal Nikam on Deshmukh Case : विरोधकांच्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही,उज्ज्वल निकमांनी फटकारलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
Pune Crime Swargate st depot: नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC च्या सेवेचा लाभ
किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ
Embed widget