GST Collection : सलग सातव्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक GST जमा, सप्टेंबर महिन्यात 1.4 लाख कोटींहून अधिक करसंकलन
GST Collection September 2022 : सप्टेंबर महिन्यात 1.4 लाख कोटींहून अधिक करसंकलन झालं आहे. सलग सातव्या महिन्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन झालं आहे.
GST Collection September 2022 : सलग सातव्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक GST जमा (GST Collection) झाला आहे. सप्टेंबर (September 2022) महिन्यातील जीएसटी करसंकलनात (July GST Collection ) वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात 1.4 लाख कोटींहून अधिक करसंकलन झालं आहे. सलग सात महिन्यांमध्ये 1.40 लाख कोटींहून अधिक जीएसटी करसंकलन झालं आहे. रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारने 1 लाख 47 हजार 686 कोटी रुपयांचा GST महसूल जमा केला आहे.
सलग सातव्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक GST जमा
ऑगस्ट 2022 मध्ये कूण जीएसटी करसंकलन 1.49 लाख कोटींहून अधिक झालं. जुलै 2022 मध्ये 1,48,995 कोटी रुपयांच्या जीएसटी कर संकलन झालं. त्याआधी जून महिन्यात 1 लाख 44 हजार 616 कोटींचा जीएसटी कर जमा झाला होता. मागील सलग सात महिन्यांपासून करसंकलन 1.40 लाख कोटीहून अधिक आहे.
वित्त मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलनात 25,271 कोटी रुपये सीजीएसटी (CGST) आणि 31,813 कोटी रुपये एसजीएसटी (SGST) तर 80,464 कोटी रुपये आयजीएसटी (IGST) इतकी रक्कम जमा झाली. यामध्ये वस्तूंच्या आयातीवर आकारण्यात आलेल्या 41,215 कोटी रुपये रकमेचाही समावेश आहे.
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी वसूल
ऑगस्ट 2022 मध्ये 1,43,612 कोटी रुपये जीएसटी संकलन करण्यात आलं. ऑगस्ट 2022 मध्ये जीएसटी करात सीजीएसटी 24 हजार 710 कोटी रुपये, एसजीएसटी 32 हजार 951 कोटी रुपये इतके होते. जुलै महिन्यात जीएसटी संकलन 1,48,995 कोटी रुपये इतके होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या