(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजारमध्ये विक्रीचा सपाटा; सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण
Share Market Opening : शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आहे. सेन्सेक्स निर्देशांकात 500 अंकांची घसरण झाली आहे.
Share Market Opening : आज शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असून सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्ससह निफ्टीतही घसरण झाल्याचे दिसून आली आहे. निफ्टी 16500 अंकांखाली घसरला आहे. सोमवारीदेखील शेअर बाजार अस्थिर होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय परिस्थिती?
आज जागतिक शेअर बाजारावरही विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले. SGX Nifty मध्ये जवळपास 100 हून अधिक अंकांची घसरण नोंदवण्यात आली. त्याशिवाय आशियाई शेअर बाजारातही घसरण झाली नोंदवण्यात आली. सोमवारी अमेरिकन शेअर बाजारात किंचीत तेजी दिसून आली.
प्री-ओपनिंगपासून घसरण
शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रापासून घसरण असल्याचे दिसून आले. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला होता. तर, निफ्टी इंडेक्समध्ये 100 अंकाच्या घसरणीसह 16500 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
आज शेअर बाजारातील बहुतांशी सेक्टरमध्ये घसरण असल्याचे चित्र आहे. निफ्टी ऑइल अॅण्ड गॅसचा शेअर निर्देशांकामध्ये तेजी दिसून आली आहे. त्याशिवाय, निफ्टी बँक, ऑटो, वित्तीय सेवा, FMCG, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, खासगी बँक, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू आदी शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 स्टॉकमधील फक्त 3 शेअर्समध्ये खरेदी सुरू असल्याचे दिसत आहे. तर, 27 शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसत आहे. आज NTPC,रिलायन्स आणि पॉवरग्रीड शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
टायटनच्या शेअर दरात चार टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याशिवाय, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, सन फार्मा, मारुती, कोटक बँक, टीसीएस, इन्फोसिस, ICICI Bank, HCL, SBI, ITC या स्टॉकमध्ये विक्रीचा सपाटा सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: