Share Market Opening: शेअर बाजारात तुफान खरेदी; सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला
Share Market Opening: शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून बाजार वधारला आहे. बाजार सुरू होताच 600 अंकांनी वधारला होता.
Share Market Opening: मंगळवारी दिसून आलेला खरेदीचा जोर आजही कायम राहिला. शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारात असलेल्या तेजीचा परिणम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 700 अंकांहून वधारला.
अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई शेअर बाजारात दिसून आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजाराला आधार मिळाला. आज सेन्सेक्स निर्देशांक 718.50 अंकांनी वधारत 55,486.12 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 222.25 अंकांच्या तेजीसह 16,562.80 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 635 अंकांची तेजी दिसत असून 55,402.93 अंकांवर व्यहार करत आहे. तर, निफ्टीमध्ये 182 अंकांची तेजी दिसत असून 16,522.75 अंकांवर व्यवहार करत आहे.
निफ्टीमधील शेअरपैकी फक्त एचयूएलचा शेअर घसरला होता. तर, उर्वरित 49 शेअर मध्ये खरेदीचा जोर दिसून आला. आज शेअर बाजारात असलेल्या तेजीमुळे 2000 हून अधिक कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, 170 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. बँक निफ्टीदेखील 35968 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
दरम्यान, मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 246 अंकांची वाढ नोंदवण्यात आली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 62 अंकांची वाढ झाली होती. सेन्सेक्समध्ये 54,767 अंकांवर तर, निफ्टी 16,340 अंकांवर स्थिरावला. मंगळवारी, शेअर बाजारातील 1961 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1260 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 143 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Rupee Vs Dollar : रुपयाने गाठला ऐतिहासिक नीचांक; कसा ठरतो चलन विनिमय दर, जाणून घ्या
- GST on Room Rent : घरभाड्यावर कोणाला 18 टक्के जीएसटी भरावा लागणार? जाणून घ्या
- EPFO : पीएफ खातेदारांना मिळणार अधिक व्याज? EPFO घेणार मोठा निर्णय0
- RBI चे महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध, ठेवीदारांना फक्त 15 हजार रुपयेच काढता येणार