Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे वातावरण, सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. निफ्टीने 18200 अंकांचा टप्पा ओलांडला.
![Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे वातावरण, सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला share market opening bell Sensex rises 300 points and Nifty50 crosses 18200 level in opening session Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे वातावरण, सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/9d6ad9c91c9dc2fb44872de08fed4a4c1667794227941290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज तेजीने झाली. जागतिक शेअर बाजारात असलेल्या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आली. आशियाई बाजारातही तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex) निर्देशांक आज 200 अंकांनी वधारत सुरू झाला. तर, निफ्टी (Nifty) निर्देशांकाने सकाळी 18200 अंकांचा टप्पा ओलांडला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 237.77 अंकांच्या तेजीसह 61,188 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 94.60 अंकांनी वधारत 18,211 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 168 अंकांनी वधारत 61,119.35 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 61.80 अंकानी वधारत 18,178.95 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकात समाविष्ट असणाऱ्या 30 पैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टीमधील 50 पैकी 39 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आहे. 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली आहे.
बँक निफ्टीतही तेजी दिसत असून आतापर्यंतचा उच्चांक गाठण्याची (All Time High) शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर दरातही तेजी दिसून येत आहे.
सेन्सेक्स निर्देशांकात एसबीआय, मारुती, एचयूएल, अॅक्सिस बँक, नेस्ले, विप्रो, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, आयटीसी, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. ब्रिटानिया कंपनीच्या शेअर दरातही तेजी दिसून येत आहे.
'शेअर इंडिया'चे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंह यांनी सांगितले, बाजार आज 18100-18400 च्या दरम्यान व्यवहार करू शकतो. बाजारात आज तेजीचे संकेत आहेत. मेटल, मीडिया, इन्फ्रा, पीएसयू बँक आणि एनर्जी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. तर, फार्मा, आयटी, एफएमसीजी आणि ऑटो शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसू शकतो.
प्री-ओपनिंग सत्रात किंचित तेजी
प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स निर्देशांकात 15 अंकांच्या किंचित तेजीसह 60965 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 93 अंकांच्या तेजीसह 18210 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
इतर महत्त्वाची बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)