(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening Bell : शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला
Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज तेजी दिसत असून सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसत आहे.
Share Market Opening Bell : जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या चांगल्या संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही (Share Market Opening ) दिसून येत आहे. आशियाई शेअर बाजाराप्रमाणे भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. आज सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारत सुरू झाले आहेत. बाजार सुरू होताच सेन्सेक्सने 55800 आणि निफ्टीने 16650 अंकांचा टप्पा ओलांडला.
आज सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स निर्देशांकाने 55800 अंकांची पातळी ओलांडली. बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 118.89 अंकांनी वधारला. त्यानंतर 250 हून अधिक अंकांनी वधारला. तर, निफ्टीत 56 अंकांची तेजी दिसून आली. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 202 अंकांच्या तेजीसह 55,884.43 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 59.90 अंकांच्या तेजीसह 16,665.15 अंकावर व्यवहार करत होता.
आज बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर निफ्टीतील 50 पैकी फक्त 3 शेअर्समध्ये घसरण असल्याचे दिसून आले. तर,उर्वरित 47 शेअर्समध्ये तेजी आहे. बँक निफ्टीही 216.75 अंकांनी वधारला आहे. बँक निफ्टी 36417 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज यूपीएलचा शेअर दर 1.82 टक्क्यांनी वधारला आहे. तर, कोटक महिंद्रा बँक शेअर दरात 1.82 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयशर मोटर्समध्ये 0.93 टक्के, एसबीआयमध्ये 0.92 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. रिलायन्सच्या शेअर दरात 0.90 टक्क्यांची तेजी दिसत आहे.
इन्फोसिसच्या शेअर दरात 0.32 टक्के, ओएनजीसीच्या शेअर दरात 0.15 टक्के आणि इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 0.11 टक्क्यांची घसरण असल्याचे दिसून येत आहे. तर, एल अॅण्ड टीच्या शेअरमध्येही विक्रीचा दबाव आहे.
निफ्टीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक, आयटी, ऑटो, फार्मा, वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर दरात तेजी असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, गुरुवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 284 अंकांची, तर निफ्टीमध्ये 84 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये 0.51 टक्के वाढ होऊन तो 55,681 वर, तर निफ्टीमध्येही 0.51 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,605 अंकांवर बंद झाला. गुरुवारी 1950 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. तर 1302 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली होती. 155 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.