एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी; सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला

Share Market Opening Bell:

Share Market Opening Bell: दिवाळीपूर्वीच्या आठड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी साजरी होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून येत आहे. आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले. सेन्सेक्स (Sensex) 550 अंकांनी वधारला. तर, निफ्टीने (Nifty) 17400 चा टप्पा ओलांडला. अमेरिकन शेअर बाजारासह आशियाई बाजारातही निक्केई वगळता इतर निर्देशांकात तेजी दिसून आली. 

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सकारात्मक सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 333.15 अंकांनी वधारत  58,744 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 126.95 अंकांनी वधारत 17,438  अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 584 अंकांच्या तेजीसह 58,995.29  अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 168 अंकांच्या तेजीसह 17,480.00 अंकांवर व्यवहार करत होता.  

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी एका कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. निफ्टीतील 50 पैकी 46 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, चार कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. 

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, एसबीआय, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एल अॅण्ड टी, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एचसीएल टेक, मारुती, एचयूएल. टीसीएस, टाटा स्टील, इन्फोसिस, नेस्ले, टायटन, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज लॅब,  टेक महिंद्रा, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व, सन फार्मा आणि एचडीएफसीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये अपोलो रुग्णालय, अॅक्सिस बँक, एचपीसीएल आणि डिवीज लॅबच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

सोमवारी बाजारात तेजी 

सोमवारी, शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 492 अंकांच्या तेजीसह 58,410 अंकांवर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 134 अंकांच्या तेजीसह 17,320  अंकांवर बंद झाला.

बँकिंग, ऑटो, आयटी, एनर्जी, फार्मा, एफएमसीजी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, मेटल्स, रिअल इस्टेट आणि मीडिया सेक्टरमधील शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअर दरात खरेदी दिसून आली.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ

Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान
MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!
NCP VS NCP Alliance : घड्याळ, तुतारीच्या आघाडीची अजितदादांकडून घोषणा! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय

पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

Embed widget