Share Market Opening Bell : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात
Share Market Opening Bell : जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
Share Market Opening Bell : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण (Share Market Opeing Bell) दिसून आली. जगभरातील शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीचा मोठा दबाव आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 827 अंकांची घसरण (Sensex Fallen) दिसून आली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 274 अंकांची घसरण दिसून आली.
गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडींचा परिणाम आज दिसून आला. बाजार सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. मात्र, त्यानंतर काही प्रमाणात बाजार सावरल्याचे चित्र दिसत होते. सकाळी 9.55 वाजता सेन्सेक्स निर्देशांक 513 अंकांच्या घसरणीसह 59,023.78 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 148.20 अंकांच्या घसरणीसह 17,611.10 अंकांवर व्यवहार करत होता.
शेअर बाजारात मीडिया आणि रियल इस्टेचशिवाय इतर सर्व सेक्टरमध्ये घसरणझ झाल्याचे दिसून आले आहे. आयटी, बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये विक्रीचा दबाब असल्याचे दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. निफ्टीतील 50 पैकी 7 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, 43 शेअरमध्ये घसरण झाल्याचे चित्र आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 5 शेअरमध्ये तेजी दिसून येत असून 25 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.
आज, इन्फोसिस 2.34 टक्के, टीसीएसमध्ये 2.17 टक्के, रिलायन्समध्ये 1.90 टक्के, एचडीएफसीमध्ये 1.75 टक्के, नेस्लेमध्ये 1.56 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.55 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 1.54 टक्के, एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.53 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
बजाज फिनसर्व्ह 2.42 टक्के, भारतीय एअरटेल 1.45 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.84 टक्के, एचडीएफसी लाइफमध्ये 0.57 टक्के, एशियन पेंट्स 0.51 टक्के आणि टाटा कंझ्युमर 0.41 टक्के, एसबीआय 0.07 टक्क्यांच्या तेजीसह व्यवसाय करत आहे.