एक्स्प्लोर

Share Market : सेन्सक्सची 300 अंकांनी उसळी, निफ्टी 17500 वर; अदानी शेअर्सची घोडदौड

Share Market Updates : आज बाजार सुरु होताच सेन्सेक्सनं 300 अंकांनी उसळी घेतली तर, निफ्टीही तेजीत 17500 वर उघडला.

Share Market Opening Bell : शेअर बाजारात (Stock Market) आज (13 मार्च) सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीच्या (Nifty) उसळीसह चांगली सुरुवात झाली आहे. आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सने 300 अंकांनी उसळी घेतली तर, निफ्टीही तेजीत 17500 वर व्यवहार करताना पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 145.06 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 59,280.19 वर उघडला आणि निफ्टी 42.80 अंकांनी म्हणजे 0.25 टक्क्यांनी वाढून 17,455.70 वर होता.

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटामुळे अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारावर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अमेरिकन बाजारातील घसरणीचा सध्या भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. जागतिक बाजारातील चढउताराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. 

शुक्रवारी घसरला होता शेअर बाजार

याआधी शुक्रवारी (10 मार्च) भारतीय शेअर बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स 671 अंकांनी घसरुन 59,135 वर बंद झाला तर, निफ्टीही 176 अंकांच्या घसरणीसह 17,412 वर बंद झाला.

कोणते शेअर्स तेजीत?

सुरुवातीच्या सत्रात तेजीत व्यवहार करणाऱ्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा (Tech Mahindra), अदानी एंटरप्रायझेज (Adani Enterprises), अदानी पोर्ट (Adani Ports), हिंदाल्को इंडस्ट्रीज (Hindalco Industries) आणि अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospitals) हे शेअर्स आहेत. 

कोणते शेअर्स घसरले?

इंडसइंड बँक (IndusInd Bank), नेस्ले इंडिया (Nestle India), टायटन (Titan), एसबीआय लाईफ इन्शॉरन्स (SBI Life Insurance) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

प्री-ओपनमधील बाजाराची परिस्थिती

आज प्री-ओपनमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरणीसह व्यवहार करत होते. BSE चा सेन्सेक्स 190.61 अंकांच्या म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह 58944.52 वर होता. NSE चा निफ्टी 19.85 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी घसरुन 17393.05 वर व्यवहार करत होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात वाढ, टाकी फुल्ल करण्यासाठी किती रुपये खर्च होणार? पाहा तुमच्या शहरातील इंधनाचे दर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget