Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात वाढ, टाकी फुल्ल करण्यासाठी किती रुपये खर्च होणार? पाहा तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Rates Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहेत. याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर काय परिणाम झाला आहे ते जाणून घ्या.
Petrol Diesel Price Today, 13 March 2023 : भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Fuel Rates) जारी केले आहेत. आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ (Crude Oil Price) झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल (Petrol Price Today) आणि डिझेलचे दर (Diesel Price Today) ठरवले जातात. त्यानुसार, आज 13 मार्च 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड तेल (Brent Crude Oil) आणि डब्ल्यूटीआय (WTI) कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ
कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम देशातील पेट्रोल (Petrol Price Today) आणि डिझेलच्या दरावर (Diesel Price Today) कोणताही परिणाम झालेला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. डब्ल्यूटीआय (WTI) कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) शुक्रवारी 0.63 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 77.16 डॉलरवर पोहोचली आहे. तर, ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये (Brent Crude Oil) 0.74 टक्क्यांची वाढ झाली असून त्याची किंमत प्रति बॅरल 83.23 डॉलरवर आहे.
पेट्रोल - डिझेलच्या दरांवर काय परिणाम?
अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol Diesel Price Today : देशांतील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
देशातील महानगरं | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
चेन्नई | 102.63 रुपये | 94.24 रुपये |
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- पुणे : पेट्रोल 106.21 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.26 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
- नागपूर : पेट्रोल 106.21 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.91 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 106.52 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LPG Price Hiked: चार वर्षात घरगुती गॅस सिलिंडरचे दर इतक्यांदा वाढले, आकडे जाणून बसेल धक्का