'या' दहा पेनी स्टॉक्सची कमाल, शुक्रवारीही उडवणार धमाल? चांगले पैसे कमावण्याची संधी!
गुरुवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. या तेजीमुळे गुरुवारी अनेकांनी चांगली कमाई केली. त्यामुळे शुक्रवारच्या सत्रातही पेनी स्टॉक्स चांगला परतावा देऊ शकतात.
मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे भांडवली बाजारात गेल्या काही सत्रांत अनिश्चितता होती. मात्र गुरुवारी ही अनिश्चितता मोडीत काढून भांडवली बाजारातील निर्देशांकांनी चांगलेच उड्डाण घेतले. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2.11 लाख कोटी रुपयांचा लाभांश भारत सरकारला देण्याची घोषणा केल्यामुळे त्याचा परिणाम भांडवली बाजारावरही दिसला. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) निर्देशांकांनी मोठा उच्चांक गाठला. गुरुवारी बीएसई निर्देशांकाने 1197 अंकांच्या तेजीसह 75418 पर्यंत पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 370 अंकांनी वाढून 22968 अंकांवर बंद झाला. याच धामाकेदार तेजीमुळे शेअर बाजारावर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
गुरुवारी कोणत्या कंपनीला फायदा, कोणाचा तोटा?
गुरुवारच्या सत्रात काही कंपन्यांचा मोठा फायदा झाला, तर काही कंपन्यांचा तोटाही झाला. या सत्रात टॉप गेनर्समध्ये अडाणी एंटरप्रायजेसचा समावेश आहे. दिवसभरात या कंपनीच्या शेअरमध्ये 7.7 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. अडाणी पोर्ट्सच्या शेअरमध्येही पाच टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक, आयसर मोटर्स, मारुति सुझूकी यांच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. तर सन फार्मा, पॉवर ग्रिड, हिंडालको, कोल इंडिया, एनटीपीसी आणि टाटा कंझ्यूमर यांच्या शेअर्समध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले.
पेनी स्टॉक देऊ शकतात चांगली कमाई
दरम्यान आठवड्याच्या शेवटच्या दिवसी म्हणजेच शुक्रवारीही शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या सत्रात तुम्हाला पेनी स्टॉकच्या माध्यमातून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर असे दहा पेनी स्टॉक जाऊन घेऊ या, जे आज चांगली कामगिरी करू शकतात. या शेअर्सना गुरुवारी अपर सर्किट लागलं होतं.
या दहा पेनी स्टॉक्सवर ठेवा नजर
Devine Impex Ltd कंपनीचा शेअर गुरुवारी 7.77 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरमध्ये गुरुवारी 5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Patron Exim Ltd या कंपनीचा शेअर गुरुवारी 9.24 रुपये झाला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Saptak Chem And Business Ltd कंपनीचा शेअरही गुरुवारी 3.58 रुपयांवर पोहोचला. गुरुवारी या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Franklin Industries Ltd कंपनीचा शेअर गुरुवारी 7.15 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये दिवसभरात 4.99 टक्क्यांची तेजी आली.
Baroda Extrusion Ltd कंपनीचा शेअर गुरुवारी 4.98 टक्क्यांनी वाढून 5.69 रुपयांपर्यंत पोहोचला.
McNally Bharat Engg Co Ltd या कंपनीच्या शेअरमध्येही गुरुवारी 4.97 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. हा शेअर गुरुवारी 5.49 रुपयांपर्यंत गेला होता. .
Radaan Media Works India Ltd या शेअरची गुरुवारची किंमत 2.54 रुपये होती. गुरुवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 4.96 टक्क्यांची तेजी आली.
Arshiya Ltd कंपनीचा शेअर गुरुवारी 4.96 टक्के वाढीसह 5.93 रुपयांवर बंद झाला.
Shangar Décor Ltd या कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारी 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 6.35 रुपयांवर जाऊन पोहोचली.
KOBO Biotech Ltd या कंपनीचा शेअरही गुरुवारी 4.67 रुपयांवर पोहोचला. गुरुवारी या कंपनीच्या शेअरमध्ये एकूण 4.94 टक्क्यांची तेजी आली.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
गुरुवारी गुंतवणूकदार मालामाल! निफ्टी पहिल्यांदाच 22800 च्या पुढे, सेन्सेक्सही 770 अंकांनी वधारला!
विराट-अनुष्काची शेअर बाजारात जबरदस्त बॅटिंग, 'ही' आयडिया लावून झटक्यात कमवले तब्बल 9 कोटी!