एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : शेअर बाजारात दिवसभर अस्थिरता; आयटी, मेटल्सने बाजार सावरला, गुंतवणूकदारांना 21 हजार कोटींचा फायदा

Sensex Closing Bell : दिवसभराच्या व्यवहारात बाजारात तेजी आणि घसरणीचा खेळ सुरू असल्याचे चित्र होते. बहुतांशी स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. आयटी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आल्याने बाजार काही प्रमाणात सावरला.

Stock Market Closing Bell :  मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. दिवसभराच्या व्यवहारात बाजारात तेजी आणि घसरणीचा खेळ सुरू असल्याचे चित्र होते. बहुतांशी स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. आयटी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आल्याने बाजार काही प्रमाणात सावरला.  आजच्या  दिवसभरातील व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 69 अंकांनी घसरून 66,459 वर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 20 अंकांनी घसरून 19,735 अंकांवर बंद झाला. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वधारले होते. तर, निफ्टी 50 मधील 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार

आजच्या व्यवहारात आयटी निर्देशांकात तेजी असल्याचे दिसून आले. आयटी स्टॉक्समध्ये खरेदीचा उत्साह दिसल्याने निफ्टी 360 अंकांच्या तेजीसह 30,288 अंकांवर स्थिरावला. त्याशिवाय, फार्मा, मेटल्स आणि कमोटिडी स्टॉक्समध्येही तेजी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्येही तेजी दिसून आली. तर, बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

इंडेक्‍स  किती अंकांवर स्थिरावला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 66,459.31 66,658.12 66,388.26 -0.10%
BSE SmallCap 35,180.57 35,257.68 35,086.03 00:07:21
India VIX 10.28 10.70 10.20 -1.25%
NIFTY Midcap 100 37,718.10 37,884.45 37,666.90 -0.01%
NIFTY Smallcap 100 11,778.25 11,805.45 11,746.05 0.64%
NIfty smallcap 50 5,338.50 5,355.25 5,323.65 0.83%
Nifty 100 19,659.85 19,722.10 19,630.70 -0.10%
Nifty 200 10,437.50 10,469.70 10,421.85 -0.08%
Nifty 50 19,733.55 19,795.60 19,704.60 -0.10%

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

मुंबई शेअर बाजारावर (BSE) लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 1 ऑगस्ट रोजी 306.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सोमवारी 31 जुलै रोजी बाजार भांडवल 306.66 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 21 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे.

2,068 समभाग वधारले

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी आज तेजीत असणाऱ्या स्टॉक्सची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,728 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,068 शेअर्स तेजीसह बंद झाले. त्याच वेळी 1,492 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 168 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 338 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 28 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांक गाठला. 12 कंपन्यांच्या शेअर्स दराला अप्पर सर्किट लागले. तर, तीन कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget