Share Market Closing Bell :शेअर बाजारात जोरदार खरेदी; 'या' शेअरमध्ये दिसली तेजी
Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज चांगली तेजी दिसून आली. निफ्टीने आज 18 हजार अंकांचा टप्पा गाठला
Share Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांकडून झालेल्या खरेदीमुळे निफ्टीने पुन्हा एकदा 18 हजार अंकांचा टप्पा गाठला. एप्रिल महिन्यात निफ्टीने हा टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर निर्देशांकात घसरण झाली होती. आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 451 अंकांच्या तेजीसह 60,566 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 130 अंकांच्या तेजीसह 18, 070 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजारात 1858 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1634 कंपन्यांचे दर घसरले. बाजारात सूचीबद्ध असलेल्या 108 शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. आज दिवसभरातील व्यवहारात 337 कंपन्यांच्या शेअर दराला अप्पर सर्किट लागला. तर, 154 कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले. आज दिवसभरात शेअर बाजाराचे बाजार भांडवल 286.72 लाख कोटी रुपये इतके झाले. आज, शेअर बाजारात सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीचे संकेत दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 293.16 अंकांनी वधारत 60,408 अंकांवर खुला झाला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टी (Nifty) 108.10 अंकांनी वधारत 18,044 अंकांवर खुला झाला होता.
मंगळवारच्या व्यवहारात, आयटी, रिअल इस्टेट, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरमधील शेअर दरात तेजी दिसून आली. बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तूच्या शेअर दरात तेजी दिसून आली. स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्येही तेजी दिसून आली.
या कंपन्यांचे शेअर दर वाढले
आज टाटा कंझ्युमरच्या शेअर दरात 2.85 टक्क्यांनी वाढ झाली. तर, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 2.37 टक्के, ब्रिटानिया कंपनीच्या शेअर दरात 2.34 टक्के, भारती एअरटेल 1.96 टक्क्यांनी दर वाढले. टायटनच्या शेअर दरात 1.67 टक्के, बजाज फायनान्सच्या शेअर दरात 1.60 टक्क्यांनी वाढ झाली.
या शेअर दरात घसरण
आज बाजारात श्री सिमेंट्सच्या शेअर दरात 0.64 टक्के, सिप्ला शेअर दरात 0.55 टक्के, आयशर मोटर्समध्ये 0.48 टक्के, बीपीसीएलच्या शेअर दरात 0.45 टक्के, टीसीएसच्या शेअर दरात 0.42 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: