एक्स्प्लोर

Ashok Kharat : अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले

Ashok Kharat: 22 रुद्राक्षांचा डबा, अंक व इंग्रजी अक्षरे असलेली पट्टी, काळ्या रंगाचे भिंग आणि हिरवट द्रव असलेली बाटली यांचा समावेश आहे.

नाशिक : धार्मिक विधीच्या आडून महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत सात दिवसांची कोठडी दिली असून, यामुळे आधी कारागृहात रवानगी झालेल्या खरातची (Ashok Kharat)  दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

 जबरदस्तीने औषधे देत गर्भपात

सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या या प्रकरणानुसार, २०२० ते २०२६ या कालावधीत कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात पीडितेला बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपीने भविष्याबाबत भीती निर्माण करत तिला आपल्या जाळ्यात ओढले. ‘मंत्र केलेले पाणी’ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकारातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने औषधे देत गर्भपात घडवून आणल्याचाही गंभीर आरोप आहे. विरोध केल्यास कुटुंबावर अनिष्ट परिणाम होतील, अशी धमकी देऊन तिला गप्प ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.(Ashok Kharat)

 22 रुद्राक्षांचा डबा, अंक व इंग्रजी अक्षरे...

दरम्यान, पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. त्यामध्ये 22 रुद्राक्षांचा डबा, अंक व इंग्रजी अक्षरे असलेली पट्टी, काळ्या रंगाचे भिंग आणि हिरवट द्रव असलेली बाटली यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर कथित अघोरी कृत्यांसाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, पीडितेकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहार करण्यात आले का, याचाही तपास सुरू आहे.(Ashok Kharat) विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी चौकशी करत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केलेल्या जागेबाबत मोठी माहिती समोर

एसआयटीच्या तपासात अशोक खरातकडून (Ashok Kharat)  होत असलेल्या फसवणुकीचे अनेक प्रकार बाहेर येत असून त्यामुळे अधिकारी देखील चक्रावले आहेत. मिरगाव (ता. सिन्नर) येथील एका कुटुंबाची १६ लाखांची जमीन अत्यंत कमी किमतीमध्ये घेण्यासाठी खरातने संबंधित कुटुंबाकडे तगादा लावला होता. अशोक खरातने (Ashok Kharat) कुटुंबाला भीती घातली, तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात कुटुंबात वाईट पटना पडेल, अशी भीती घातली. याच दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू देखील झाला. याचा गैरफायदा घेत खरातने, जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती दाखवत त्याला हवी असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करून घेतली. याच जमिनीवर अशोक खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केल्याची बाब समोर आली आहे.(Ashok Kharat) 

कल्पना खरात फरार, लूकआऊट नोटीस जारी

 नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) फरार असल्याने आता एसआयटीकडून खरात नातलगांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन यांची पुन्हा एसआयटीकडून चौकशी केली. तसेच कल्पना खरातच्या दोन भावांचीही तपास पथकाने चौकशी करण्यात आली. कल्पना खरात फरार असून एसआयटीचे पथक कल्पना खरातच्या मागावर आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी देखील कल्पना खरात अद्याप मिळून न आल्याने कल्पना खरातविरोधात लूकाऊट नोटीस काढण्यात आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

आणखी वाचा - Ashok Kharat: एका तरुण मुलीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांना भीती दाखवून लुटलं; अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत धक्कादायक माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Embed widget