एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 61500 वर घसरला, बँकिंग आणि आयटी शेअरमध्ये घसरण

Share Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारावर दबाव दिसत आहे. सेन्सेक्स 61500 पर्यंत घसरला आहे. निफ्टी 18300 च्या खाली पोहोचला. बँक निफ्टीही 43300 च्या खाली घसरला.

Share Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारावर (Share Market) दबाव दिसत आहे. सेन्सेक्स 61500 पर्यंत घसरला आहे. निफ्टी 18300 च्या खाली पोहोचला. बँक निफ्टीही 43300 च्या खाली घसरला. शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी मोठ्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली, मात्र त्यानंतर बाजार सावरला. बाजार उघडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टीने घोडदौड सुरु केली. जागतिक बाजारातील घसरणीमुळे सुरुवातीच्या व्यापारात विक्रीचे वर्चस्व दिसून आलं.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसह सत्राची सुरुवात

शेअर बाजार शुक्रवारी सेन्सेक्स 265 अंकांनी घसरून 61,534 वर उघडला, तर निफ्टी 96 अंकांनी घसरून 18,319 वर उघडला. बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारातील तीव्र घसरणीचाही गुंतवणूकदारांवर परिणाम झाल्याचे दिसून आलं.

सुरुवातीच्या सत्रात गुंतवणूकदारांनी विक्री केली मात्र, नंतर गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवत खरेदी करण्यास सुरुवात केली. यानंतर, सकाळी 9.32 वाजता, सेन्सेक्सने 82 अंकांच्या वाढीसह 61,881 वर व्यवहार करण्यास सुरुवात केली, तर निफ्टी 24 अंकांनी चढून 18,439 वर पोहोचला.

शेअर बाजारात अस्थिरता कायम

आठवड्याच्या शेवटी भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली, सेन्सेक्ससह आणि निफ्टी दोन्हीची सुरुवात घसरणीने झाली, पण त्यानंतर शेअर बाजार वधारल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीच्या सत्रात रिलायंस आणि L&T चे शेअर तेजीत होते. अमेरिकन शेअर बाजारात गुरुवारी पडझड पाहायला मिळाली, त्यानंतर बाजारात घसरणीसह बंद झाला. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बँकिंग आणि आयटी शेअरमध्ये घसरण

शेअर बाजारातील घसरणीमुळे बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एमएफसीजी यांसारख्या क्षेत्रांमध्ये घसरण पाहायला मिळाली. पावर, मीडिया, रिअल इस्टेट आणि इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये मात्र तेजी दिसून येत आहे. मिडकॅप शेअरमध्ये घसरण झाली आहे, तर स्मॉलकॅप शेअर तेजीत आहेत. 

'या' शेअर्सला 'अच्छे दिन'

गुंतवणूकदारांनी रिलायंच्या शेअरला पसंती दर्शवली आहे. रिलायन्स 0.84 टक्क्यांनी तेजीत आहे. त्याशिवाय लार्सन 1.21 टक्के, , पॉवर ग्रिड 0.44 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.38 टक्के, भारती एअरटेल 0.33 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे, टीसीएस 1.06 टक्के, इन्फोसिस 1.06 टक्के, एशियन पेंट्स 1 टक्के, विप्रो 0.92 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVEDeepak Kesar : शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होण्यात तांत्रिक अडचणी - केसरकरMahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Embed widget