एक्स्प्लोर

Share Market Updates: घसरणीसह शेअर बाजार सुरू; सेन्सेक्स 200 अंकांनी गडगडला

Share Market Updates: शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण झाली.

Share Market Updates : शेअर बाजारातील व्यवहार आज घसरणीसह सुरू झाला. सकाळी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 200 अंकांनी घसरून 58,581 वर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 17,492 अंकांवर व्यवहार करत होता. ऑटो आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. घसरणीनंतर पुन्हा सावरण्यासाठी सेन्सेक्स आणि निफ्टीतील कंपन्यांना संघर्ष करावा लागत होता. 

अमेरिकन शेअर बाजारातील घसरण काही प्रमाणात थांबल्यानंतर आशियाई बाजारदेखील सावरला. अॅपलने तिमाही निकालात विक्रमी विक्री केली असल्याचे जाहीर केले. तासाभरानंतर अॅपलचे शेअर पाच टक्क्यांनी वधारले. 

निफ्टी 100 चा निर्देशांक 0.43 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे स्मॉल कॅपमधील शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. 

Share Market Updates: घसरणीसह शेअर बाजार सुरू; सेन्सेक्स 200 अंकांनी गडगडला

निफ्टीमध्ये हिरो मोटोकॉर्पचा शेअर 1.26 टक्क्यांनी घसरला होता. 'हिरो'चा शेअर 2746.65 रुपयांवर व्यवहार करत होता. एचसीएल टेक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाली.

ओएनजीसी, टाटा स्टील, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील आणि ग्रासिम इंडस्ट्रीजचे शेअर्स वधारले.

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी टीसीएस, टायटन, विप्रो, एचसीएल टेक आणि इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

दरम्यान, टाटा स्टील, श्री सिमेंट, बँक ऑफ इंडिया, इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) आणि वन 97 कम्युनिकेशन्स (Paytm) या कंपन्यांचे येत्या काही दिवसात तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. 

गुरुवारी तीन सत्रापासून सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला होता. गुरुवारी शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 770.31 अंकांनी घसरला तर निफ्टीही 219.80 अंकाची घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 1.29 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,788.02 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.24 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,560.20 वर पोहोचला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget