एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : शेअर बाजारातील गुंतवणूकादारांचे चांगभलं; एकाच दिवसात कमावले 3.5 लाख कोटी

Sensex Closing Bell : भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह दिसून आला. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.50 लाख कोटींची भर पडली.

मुंबई : या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला. मागील आठवड्यात बाजारात काहीशी अस्थिरता दिसून आली होती. त्यानंतर आज शेअर बाजार वधारला. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 267 अंकांच्या तेजीसह 65,216 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 83 अंकांच्या तेजीसह 19,393 अंकावर बंद झाला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आज दिवसभरातील व्यवहारात आयटी, एफएमसीजी आणि बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्याशिवाय, एनर्जी, मेटल्स, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर सेक्टरमध्ये ही गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह दिसला. ऑईल अॅण्ड गॅस, मीडिया स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली.  मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्सदेखील वधारले. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, निफ्टीतील 50 पैकी 39 कंपन्यांचे शेअर दर वधारले. 

इंडेक्‍स किती अंकांवर स्थिरावला दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,216.09 65,335.82 64,852.70 0.41%
BSE SmallCap 35,535.38 35,558.62 35,326.80 0.71%
India VIX 11.96 12.59 11.17 -1.50%
NIFTY Midcap 100 38,126.40 38,160.85 37,830.65 0.82%
NIFTY Smallcap 100 11,756.80 11,768.85 11,696.60 0.63%
NIfty smallcap 50 5,331.95 5,343.70 5,302.15 0.37%
Nifty 100 19,303.40 19,333.20 19,205.25 0.49%
Nifty 200 10,290.75 10,305.05 10,235.50 0.54%
Nifty 50 19,393.60 19,425.95 19,296.30 0.43%

आज दिवसभरातील व्यवहारात पॉवरग्रीडच्या शेअर दरात 2.76 टक्के, बजाज फायनान्स 2.702 टक्के, इंडसइंड बँक 2.06 टक्के, भारती एअरटेल 1.92 टक्के, एनटीपीसी 1.51 टक्के, आयटीसी 1.31 टक्के, बजाज फिनसर्व 1.12 टक्के, इन्फोसिस 1.10 टक्के, नेस्ले 1.04 टक्के, टाटा स्टील, 0.99 टक्के, टीसीएस 0.95 आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

तर, रिलायन्सच्या शेअर दरात 1.50 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 0.87 टक्के, एसबीआय 0.28 टक्के, मारुती सुझुकी 0.24 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

गुंतवणूकदारांना 3.50 लाख कोटींचा फायदा 

आज दिवसभरातील व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 306.89 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 303.39 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.50 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

 

2097 कंपन्यांचे शेअर दर वधारले

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) सूचीबद्ध असलेल्या बहुतांशी कंपन्यांचे शेअर दर तेजीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,907 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,097 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. त्याच वेळी 1,623 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 187 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 208 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 46 कंपन्यांच्या शेअर्स दराने  52 आठवड्यांच्या नीचांक गाठला. 19 कंपन्यांच्या शेअर दराने अप्पर सर्किट लागले. तर, 3 कंपन्यांच्या शेअर दरांना लोअर सर्किट लागले. 

महत्त्वाच्या बातम्या

मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget