एक्स्प्लोर

रिक्त जागा 195, पगार दीड लाख रुपये, बँकेत नोकरीची मोठी संधी, अर्ज करण्याची अंतिम तारीख किती?

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) 195 अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 26 जुलै आहे.

Sarkari Naukri Bank job : बँकेत नोकरी (Bank Job) हवी असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) 195 अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 26 जुलै आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  
 
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध स्केलच्या अधिकारी पदांची भरती सुरु झाली आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. बँकेच्या विविध विभागांमध्ये स्केल II, III, IV, V आणि VI पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या पदांसाठीची अधिसूचना काल म्हणजेच 10 जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2024 आहे. तुमचे ऑफलाइन अर्ज 26  जुलैपूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजेत.

एकूण 195 पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. या रिक्त जागा इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी, डिजिटल बँकिंग, सीआयएसओ, सीडीओ अशा विविध विभागांसाठी आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक अशी अनेक पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी पात्रता काय?

विविध पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार आहे. पदवीधर, सीए, सीएमए, सीएफए, बीई, बीटेक, लॉ इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. वयोमर्यादा देखील पोस्टनुसार 50 वर्षे, 45 वर्षे, 40 वर्षे, 38 वर्षे आणि 35 वर्षे आहे. 

कसा कराल अर्ज? 

या पदांचे तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. bankofmaharashtra.in. या वेबसाईटवर तुम्हाला या संदर्भात आणखी काही संपर्क करायचा असल्यास, तुम्ही bomrpcell@mahabank.co.in या ईमेल पत्त्यावर करू शकता. या पदांसाठीचे अर्ज फक्त ऑफलाइन असतील. यासाठी तुम्हाला पोस्टाच्या नावासह पूर्ण केलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. स्पीड पोस्टद्वारेच अर्ज पाठवा. अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता हा - महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, 'लोक मंगल' 1501, शिवाजी नगर, पुणे - 411005.

फी किती असणार?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1180 रुपये शुल्क भरावे लागेल. तुम्हाला या रकमेचा डिमांड ड्राफ्ट बनवावा लागेल. तो अर्जासोबत सबमिट करावा लागेल. आरक्षित श्रेणीसाठी शुल्क 118 रुपये आहे.

निवड कशी असणार?

या पदांवरील निवडीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षेला बसावे लागेल. यानंतर मुलाखत घेतली जाईल. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.

पगार किती मिळणार?

निवड झाल्यास, पदानुसार वेतन देखील बदलते. स्केलनुसार वेतन देण्यात येणार आहे. वरच्या पदांसाठी पगार हा 1 लाख 40 हजार रुपये ते 1 लाख 56 हजार रुपये प्रति महिना असणार आहे. त्याखालील पदांसाठी 1 लाख 20 हजार रुपये ते 1 लाख 35 हजार रुपये प्रति महिना पगार असणार आहे. तसेच काही पदांसाठी कमाल पगार 1 लाख रुपयांपर्यंत आहे. तर काही पदांसाठी पगार हा 93 हजार रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या:

बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, 1500 पदांसाठी भरती सुरु, काय आहे प्रक्रिया?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget