आयपीओ येण्याच्या दोन दिवसांआधी मोठी घडामोड, 'या' कंपनीने जमवले 366 कोटी रुपये!
Swiggy IPO : सध्या स्विगी या आयपीओची सगळीकडे चर्चा आहे. मात्र स्विगी कंपनीसोबतच आणखी दोन महत्त्वाचे आयपीओ गुंतवणुकीसाठी येणार आहेत.
Sagility IPO : सध्या स्विगी कंपनीच्या आयपीओची (IPO) सगळीकडे चर्चा आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. मात्र स्विगीच्या आयपीओआधी सॅजिलिटी इंडिया लिमिटेड या कंपनीचा आयपीओ येणार आहे. येत्या 5 नोव्हेंबरपासून तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. दरम्यान, हा आयपीओ येण्याधीच या कंपनीच्या पालक कंपनीने कोट्यवधी रुपये जमवले आहेत. त्यामुळे या व्यवहाराचा परिणाम सिजिलिटी कंपन्या आयपीओ खरेदीवरही पडू शकतो.
पालक कंपनीने जमवले 366 कोटी रुपये
Sagility India या कंपनीत तुम्हाला 5 ते 7 नोव्हेंबर या काळात गुंतवणूक करता येणार आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. सॅजिलीटी इंडिया या कंपनीच्या पालक कंपनीचे नाव Sagility BV असे आहे. या पालक कंपनीने एकूण 366 कोटी रुपये जमवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 9 इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडून हे पैसे उभारण्यात आले आहेत. कंपनीने 30 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने हा व्यवहार केला आहे.
आयपीओतून उभे करणार 2107 कोटी रुपये
Sagility India ही कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 2107 कोटी रुपये उभे करणार आहे. कंपनीने आपल्या शेअरचा किंमत पट्टा 28 रुपये ते 30 रुपये प्रति शेअर असा निश्चित केला आहे. या कंपनीच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये 500 शेअर्स आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 15,000 रुपये असणे गरजेचे आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एका शेअरमागे 2 रुपयांची सूट दिली आहे. Sagility India ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 70.22 कोटी शेअर्स जारी करणार आहे.
कंपनीची वित्तीय स्थिती काय आहे?
जूनच्या तिमाहीत या कंपनीचा महसूल 1247.76 कोटी रुपये आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा 22.29 कोटी रुपये होता. वित्त वर्ष 2024 दरम्यान कंपनीचा एकूण महसूल 4781.50 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर हा महसूल 12 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीच्या नफ्यात 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
स्विगी सोबतच 'या' जबरदस्त कंपनीचा आयपीओ आला, बम्पर कमाईसाठी पैसे ठेवा तयार!
फक्त 5000 रुपयांची SIP अन् करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या नेमकं कसं?
अमिताभ ते माधुरी, दिग्गजांची कोट्यवधीची गुंतवणूक, स्विगीच्या आयपीओमध्ये असं नेमकं काय आहे?