Rupee-Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू; महागाईची टांगती तलवार, असा होणार तुमच्यावर परिणाम
Rupee-Dollar:
Dollar Vs Rupee : डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा कल कायम आहे. चलन बाजारात रुपयाचा विनिमय दर एका डॉलरच्या तुलनेत 83 रुपयांच्या खाली घसरून 83.16 रुपयांवर आला. रुपयाची ही घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनेही (RBI) हस्तक्षेप केला आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयने सरकारी बँकांमार्फत डॉलरची विक्री केली आहे.
RBI ने डॉलरची विक्री करूनही, रुपया डॉलरच्या तुलनेत 83 रुपयांच्या खाली राहिला आणि 83.14 च्या पातळीवर बंद झाला. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया प्रथमच 83.29 रुपयाच्या नीचांकी पातळीवर घसरला होता. विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत, त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होणे हे भारतासाठी चांगली बाब नाही.
डॉलर महागल्यास भारतात आयात करणे महाग होऊ शकते. कच्च्या तेलासह, खाद्यतेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या भारत सर्वाधिक आयात करतो त्यांना जास्त किंमत मोजावी लागू शकते. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट होऊ शकते, त्यानंतर व्यापार तूट, चालू खात्यातील तूट वाढू शकते.
परकीय चलनाच्या साठ्यात घट
परकीय चलनाच्या साठ्याने पुन्हा एकदा 600 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर 2021 मधील 645 अब्ज डॉलरच्या उच्च पातळीपेक्षा सध्याचा साठा कमीच आहे. वर्ष 2022 मध्ये, रुपयाची घसरण थांबवण्यासाठी, आरबीआयला डॉलर्सची विक्री लागली होती. त्यामुळे परकीय चलनाचा साठा कमी झाला.
आज पुन्हा RBI ने डॉलर्सची विक्री केल्याचे वृत्त आहे. रुपयांची घसरण आणखी रोखण्यासाठी आरबीआयने हस्तक्षेप केल्यास परकीय चलनाच्या साठ्यात घट होऊ शकते.
रुपया आणखी कमकुवत झाल्यास काय होईल?
कच्च्या तेलाची आयात महागणार आहे
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याबरोबरच रुपया कमकुवत झाल्यास आणि डॉलर वधारल्यास भारतीय ऑईल कंपन्यांना आयातीसाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
सोने खरेदी महागणार!
भारत सोन्याच्या प्रमुख आयातदारांपैकी एक आहे. सणांचा हंगाम जवळ आला आहे. गणेश चतुर्थीपासून, नवरात्री, धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत लोक सोने खरेदी करतात. डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याची आयात महाग झाली, तर देशात सोन्याच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करण्यासाठी खिसा अधिक रिकामा करावा लागेल.
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स महागणार
भारत हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या प्रमुख आयातदारांपैकी एक आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यास इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात महाग होऊ शकते, त्यामुळे या वस्तूंच्या किमती वाढू शकतात.
कार महाग होऊ शकतात
अनेक ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या सुट्या भागांसाठी आयातीवर अवलंबून आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास या भागांच्या आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. कमकुवत रुपया आणि डॉलरची मजबूती यामुळे वाहन कंपन्यांचा खर्च वाढला तर ते नुकसान भरून काढण्यासाठी वाहनांच्या किमती वाढवू शकतात.
परदेशात शिक्षणावर परिणाम
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण भारतीय पालकांच्या अडचणीत भर घालू शकते. ज्या पालकांची मुले परदेशात शिकत आहेत त्यांना रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसा खर्च करावा लागणार आहे,