एक्स्प्लोर

नवरदेव 61 वर्षाचा तर नवरी 55 वर्षाची, लग्नाचा खर्च 400 कोटी, पाहुण्यांसाठी 90 खासगी जेट

अमेझॉनचे मालक आणि जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (Jeff Bezos)  हे त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेझशी दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत.

Jeff Bezos wedding : अमेझॉनचे मालक आणि जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (Jeff Bezos)  हे त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेझशी दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. हे लग्न इटलीच्या सुंदर व्हेनिस शहरात होणार आहे. ज्याला 'शतकातील सर्वात भव्य लग्न' म्हटले जात आह. परंतु या भव्य लग्नाच्या झगमगाट आणि ग्लॅमरमध्ये, व्हेनिसच्या रस्त्यांवर निषेधाचे आवाजही तीव्र होत आहेत. स्थानिक लोक आणि कार्यकर्ते या लग्नाबद्दल संतप्त आहेत. लोक 'नो स्पेस फॉर बेझोस' चे बॅनर फडकवत रस्त्यावर उतरले आहेत. या लग्नाचे संपूर्ण प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

 24 ते 28 जून 2025 दरम्यान विवाह सोहळा

61 वर्षीय वर आणि 55 वर्षीय वधूचा भव्य विवाह सोहळा पार पडणार आहे. 61 वर्षीय जेफ बेझोस आणि त्यांची प्रेयसी 55 वर्षीय लॉरेन सांचेझ या आठवड्यात व्हेनिसमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. हा विवाह 24 ते 28 जून 2025 दरम्यान होणार आहे. हा सोहळा भव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडण्यात आलेली नाही. या मेगा इव्हेंटमध्ये व्यवसाय, राजकारण, हॉलिवूड आणि वित्त क्षेत्रातील 200 ते 250  व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. परंतु या भव्य इव्हेंटमुळे व्हेनिसमधील लोक संतप्त झाले आहेत. 

आर्सेनलमध्ये पार पडणार विवाह सोहळा

सुरुवातीला, जेफ बेझोसने त्यांच्या लग्नासाठी व्हेनिसच्या कॅनारेजिओ परिसरातील स्कुओला ग्रांडे डेला मिसेरिकॉर्डिया निवडले होते. ही एक मध्ययुगीन धार्मिक शाळा आहे, जी तिच्या ऐतिहासिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. परंतु स्थानिकांना याची जाणीव होताच, निषेध सुरू झाला. 'नो स्पेस फॉर बेझोस' मोहिमेअंतर्गत, निदर्शकांनी रस्ते, कालवे आणि पुलांवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परिणामी, बेझोसला त्यांच्या लग्नाचे ठिकाण बदलावे लागले. आता हे लग्न व्हेनिसच्या पूर्व कॅस्टेलो जिल्ह्यात असलेल्या आर्सेनलमध्ये होणार आहे. हे 14  व्या शतकातील एक विशाल संकुल आहे, ज्याच्या बाजला पाण्याने वेढलेले आहे. सर्व बाजूंनी तटबंदी आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीवरून येथे पोहोचणे जवळजवळ अशक्य आहे. आर्सेनलची निवड त्याच्या सुरक्षिततेमुळे आणि गुप्ततेमुळे करण्यात आली आहे.

400  कोटींचा खर्च, 90 खासगी जेट 

जेफ बेझोसच्या या लग्नाचे बजेट ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या मेगा इव्हेंटवर 48 दशलक्ष युरो (सुमारे 55.69  दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 400 कोटी रुपयांहून अधिक) खर्च येईल असा अंदाज आहे. पाहुण्यांना नेण्यासाठी 90 खाजगी जेट व्हेनिस, ट्रेव्हिसो आणि वेरोना विमानतळांवर उतरतील. याशिवाय, शहरातील कालव्यांमधून पाहुण्यांना आर्सेनलला नेण्यासाठी 30 वॉटर टॅक्सी बुक करण्यात आल्या आहेत.

लग्नात पाहुण्यांना राहण्यासाठी व्हेनिसमधील सर्वात आलिशान हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. अमन व्हेनिस, ग्रिटी पॅलेस, सेंट रेगिस, बेलमंड सिप्रियानी आणि हॉटेल डॅनिएली सारखी आलिशान हॉटेल्स पूर्णपणे किंवा अंशतः राखीव ठेवण्यात आली आहेत. पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची विशेष काळजी घेतली जात आहे.

लॉरेन सांचेझ 12 कोटींचा लेहेंगा घालणार 

लॉरेन सांचेझचा लग्नाचा लेहेंगाही चर्चेत आहे. वृत्तानुसार, तिच्या लग्नाच्या पोशाखावर सुमारे १२९,०२०,२७१ रुपये (सुमारे १.५ दशलक्ष डॉलर्स) खर्च झाले आहेत. हा लेहेंगा इतका खास आहे की तो या लग्नातील सर्वात मोठ्या आकर्षणांपैकी एक मानला जात आहे. याशिवाय जेफने लॉरेनला साखरपुड्यात ३-५ दशलक्ष डॉलर्सची गुलाबी हिऱ्याची अंगठी दिली होती, जी आधीच चर्चेत आली आहे.

पाहुणे कोण असतील?

या लग्नाला जगभरातील सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. पाहुण्यांच्या यादीत बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, इवांका ट्रम्प, जेरेड कुशनर, लिओनार्डो डिकॅप्रियो, किम कार्दशियन, केटी पेरी, डायन वॉन फर्स्टनबर्ग आणि एलोन मस्क अशी नावे आहेत. हे सर्व पाहुणे गुरुवारपासून व्हेनिसमध्ये येण्यास सुरुवात करतील आणि शनिवारी होणाऱ्या भव्य पार्टीला उपस्थित राहतील. विशेष म्हणजे हे तेच पाहुणे आहेत ज्यांनी २०२३ मध्ये बेझोस आणि सांचेझच्या साखरपुड्यालाही हजेरी लावली होती. ती पार्टी अमाल्फी कोस्टजवळील पोसिटानो येथे आयोजित करण्यात आली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
PMC Election 2026: पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
Embed widget