Robert Kiyosaki : मोठा क्रॅश आलाय, सावध व्हा, सोनं-चांदी खरेदी करा, रॉबर्ट कियोसाकीचा संकटाची चाहूल करुन देत मोठा इशारा
Robert Kiyosaki : रिच डॅड, पुअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी स्टॉक आणि बाँड मार्केटमध्ये मोठा क्रॅश आलाय, असं म्हटलंय.

नवी दिल्ली : रिच डॅड, पुअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना सोने-चांदी आणि बिटकॉईन खरेदी करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. कियोसाकी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत इशारा दिला आहे. स्टॉक आणि बाँड मार्केटमध्ये मोठा क्रॅश आलाय, याबद्दल यापूर्वीच सांगितलं होतं. लोकांनी सोने, चांदी आणि बिटकॉईनवर लक्ष ठेवावं, असं आवाहन कियोसाकी यांनी केलं आहे.
कियोसाकी यांनी आर्थिक यंत्रणेत जोरदार उलटफेर होत आहेत. त्यामुळं या संकटाचा सामना करताना सोने आणि चांदीसह क्रिप्टोकरन्सी महत्त्वाची भूमिका बजावतील, असं म्हटलं. ते म्हणाले सोने, चांदी आणि बिटकॉईनवर लक्ष द्या. ते कशाचे संकेत देत आहेत जाणून घ्या. सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर आहेत, चांदीची मागणी वाढत आहे, बिटकॉईनमध्ये देखील उसळी आहे, असं कियोसाकी म्हणाले.
कियोसाकी यांनी यापूर्वी रिच डॅडस प्रोफेसी, व्हू स्टोल माय पेन्शन आणि फेक या पुस्तकात स्टॉक आणि बाँढ मार्केटमध्ये येणाऱ्या घसरणीसंदर्भातील इशारा दिला होता. कियोसाकी यांच्या मते ती विशाल घसरण झाली आहे. ते म्हणाले की स्टॉक, बाँड, ईटीएफ आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणारे नुकसान सहन करत आहेत.
कियोसाकी यांनी या स्थितीला जागतिक बँकिंग यंत्रणेला कारणीभूत ठरवलं आहे. फेडरल रिझर्व्ह, यूरोपीय सेंट्रल बँक, बँक ऑफ जपान, बँक ऑफ इंग्लंड, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटस या केंद्रीय बँकांचं नाव घेत जबाबदार धरलं. तुम्ही जर खरं सोनं, चांदी आणि बिटकॉईन खरेदी करु शकला तर या आपत्तीनंतर नवे श्रीमंत आणि जगाचे नवे नेते म्हणून समोर येऊ शकता, असं कियोसाकी म्हणाले.
कियोसाकी यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी उपरोधिकपणे म्हटलं की तुम्ही कॉलेजमध्ये परत जावा, शिक्षण कर्ज घ्या, त्यात बुडून जावा मात्र पैशांसदर्भात काही शिकू नका, पैशाच्या खऱ्या जगाबद्दल काही शिकू नका, असं उपरोधिकपणे कियोसाकी म्हणाले.
कियोसाकी यांनी मार्च 2023 मध्ये पोस्ट करत म्हटलं होतं की आता बुडबुडे फुटत आहेत इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना असू शकते. जपान आणि अमेरिका याचं केंद्र असू शकतात. आपल्या नेत्यांनी एका जाळ्यात फसवलं आहे. त्यांनी रिच डॅडस प्रोफेसी या पुस्तकात 1929 पेक्षा मोठी मंदी येईल, असं म्हटलं होतं.
PLEASE LISTEN to Gold, Silver, & Bitcoin. What are they telling you?
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) April 13, 2025
Gold is at an all time high, demand for silver is exploding, and Bitcoin is roaring.
Are you listening?
REPEATING MYSELF, I warned of the biggest stock and bond market crash in history was coming in my…
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























