RBI : आम्ही व्याज दर कमी केले, त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवा, आरबीआयच्या सार्वजनिक आणि खासगी बँकांना कडक सूचना
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 5 डिसेंबरला रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यानंतर रेपो रेट 5.25 टक्क्यांवर आला आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीची बैठक 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात जाहीर केलं होतं. त्यांनतर बँकांकडून कर्जाच्या व्याज दरात कपात करण्याबाबत पावलं उचलली जाणं आवश्यक होतं. मात्र, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर स्थायी वाढीसाठी व्याज दर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आग्रह धरला.
व्याज कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवा : RBI
आरबीआयनं 2025 मध्ये रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळं रेपो रेटो 6.5 टक्क्यांवरुन 5.25 टक्क्यांवर आणली गेली आहे. भारतानं आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत 8.2 टक्के विकास दर गाठला आहे. आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी 2025 मध्ये बँकांच्या स्थितीत सातत्यानं सुधारणार होत आहे. मात्र, बँकांना निष्काळजीपणापासून वाचलं पाहिजे आणि बदलत्या स्थितीत सतर्क राहिलं पाहिजे. आरबीआयच्या बैठकीत बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओंचा समावेश होता. म्हलोत्रा यांनी म्हटलं की रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यंची कपात आणि तंत्रज्ञानाच्या अधिक वापरानं मध्यस्थांच्या खर्चात कपात केली पाहिजे आणि कार्यक्षमता वाढवली पाहिजे, ज्यामुळं अधिक वित्तीय समावेशन भक्कम होईल.
मल्होत्रा यांनी चांगल्या ग्राहक सेवांवर अधिक भर देत बँकांना तक्रारी कमी करण्याकडे आणि अतंर्गत यंत्रणा मजबूत करण्याकडे लक्ष देण्याचा आग्रह केला. डिजिटल फसवणुकींमुळं वाढत्या जोखमीचा मुद्दा देखील म्हलोत्रांनी मांडला. अधिक मजबूत आणि सुरक्षा उपाय राबवले जावेत असं त्यांनी म्हटलं. ग्रहाकांना पुन्हा केवायसी आणि दाव्याशिवाय शिल्लक असलेली रक्कम परत करण्याबाबत बँका करत असलेल्या प्रयत्नांचं आरबीआय गव्हर्नर संजय म्हलोत्रांनी कौतुक केलं.
दरम्यान, आरबीआय आणि बँकांच्या बैठकीत डेप्युटी गव्हर्नर टी रवि शंकर, स्वामीनाथन जे, पूनम गुप्ता आणि एससी मुर्मू उपस्थित होते. यापूर्वी अशीच बैठक 27 जानेवारी 2025 ला देखील झाली होती.
संजय म्हलोत्रा यांनी आरबीआयचं गव्हर्नर पद स्वीकारल्यानंतर रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. पहिल्यांदा 50 बेसिस पॉईंटची कपात करत रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.00 टक्क्यांवर आणला गेला. त्यानंतर सलग दोनवेळा रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली. नंतरच्या काळात रेपो रेट कायम ठेवण्यात आले होते. अखेर डिसेंबरचं पतधोरण जाहीर करताना 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे.
























