Reliance Jio IPO: रिलायन्स जिओचा आयपीओ धमाका करणार,भारतातील सर्वात मोठा आयपीओ कधी येणार? मोठी अपडेट समोर
Reliance Jio IPO: रिलायन्स जिओच्या आयपीओची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. रिलायन्स जिओच्या आयपीओसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Reliance Jio IPO नवी दिल्ली : रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा आयपीओ पुढील वर्षी येऊ शकतो. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी त्यांची टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा आयपीओ पुढील म्हणजेच 2025 मध्ये आणला जाईल. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओसदंर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कोट्यवधी गुंतवणूकदार रिलायन्स जिओच्या आयपीओची वाट पाहत आहेत.
रिलायन्स जिओची मार्केट वॅल्यू 100 अब्ज डॉलर
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचं बाजारमूल्य 8.4 लाख कोटी म्हणजेच 100 अब्ज डॉलर पर्यत आहेत. जेव्हा रिलायन्स जिओचा आयपीओ येईल तेव्हा तो भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असेल. रिलायन्स जिओखडे 47.9 कोटी सबसक्राइबर्स आहेत. भारतातील सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीची मुख्य स्पर्धा भारती एअरटेल सोबत आहे.
रिलायन्स जिओच्या आयपीओची 5 वर्ष प्रतीक्षा
भारतात टेलिफोन, ब्रॉडबँड सर्व्हिसेस आणि डिजीटल सर्व्हिसेस देणारी सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओच्या आयपीओची वाट गुंतवणूकदार पाहत आहे. 2019 मध्ये झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक बैठकीत ते टेलिकम्युनिकेशन कंपनी आणि रिटेल कंपनीला शेअर बाजारात पुढील पाच वर्षात लिस्ट करणार असल्याचे संकेत मुकेश अंबानी यांनी दिले होते.
सीएनबीसी टीव्ही-18 च्या रिपोर्टनुसार रिलायन्स जिओचा आयपीओ दोन प्रकारे येऊ शकतो. यामध्ये रिलायन्स जिओला स्पिन ऑफ नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचपासून वेगळं केलं जाईल. यानंतर प्राइस डिस्कवरी सिस्टीमनुसार शेअर बाजारात रिलायन्स जिओला लिस्ट केलं जाऊ शकतं. याशिवाय संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल असू शकतो. यामध्ये मायनॉरिटी शेअरहोल्डर्स त्यांची रिलायन्स जिओतील भागिदारी विकू शकतात.
रिलायन्स रिटेल वेंचर्सच्या आयपीओ संदर्भात नेमकी काय अपडेट
रिलायन्स जिओच्या आयपीओ प्रमाणं रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडच्या आयपीओची देखील गुंतवणूकदार प्रतीक्षा करत आहेत. रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओचा आयपीओ पुढील वर्षी येऊ शकतो. रिलायन्स जिओच्या आयपीओअगोदर रिलायन्स रिटेलचा आयपीओ पुढं येईल.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)