एक्स्प्लोर

Reliance Industries ची पहिल्या तिमाहीत रेकॉर्डब्रेक कमाई, जिओ-रिटेलच्या मदतीनं नफा 78 टक्क्यांनी वाढला, आकडेवारी समोर

RIL Q1 Results: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कमाईचे पहिल्या तिमाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. रिलायन्सनं पहिल्या तिमाहीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

RIL Q1 Results मुंबई:अब्जाधीश आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रमी कमाई केली आहे. रिलायन्सचा पहिल्या तिमाहीतील नफा 78.3 टक्क्यांनी वाढून 26,994 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे. मुकेश अंबानी यांनी पेट्रोलियम व्यवसायानं देशांदर्गत मागणीची पूर्तता केल्याचं म्हटलं. तर, जिओ-बीपी नेटवर्कच्या सेवेद्वारे देखील चांगल्या प्रकारची वाढ झाल्याचं म्हटलं. इंधन आणि उत्पादनाच्या मार्जिनमध्ये देखील सुधारणा झाल्यानं चांगल्या कामगिरीला प्रोत्साहन मिळाल्याचं अंबानी म्हणाले.

कंपनीचा नफा ग्राहक व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या विक्रीच्या दमदार कामगिरीमुळं वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं शुक्रवारी शेअर बाजाराला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीची माहिती दिली. एप्रिल ते जून 2025 मध्ये कंपनीनं 26994 कोटी रुपयांचा नफा मिळवला. जो प्रति शेअर 19.95 रुपये इतका राहिला. गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजनं पहिल्या तिमाहीत 15138 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही बाजारमूल्याचा विचार केला असता देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्सचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीत 39 टक्के राहिला. कंपनीनं जानेवारी- मार्च 2025 या काळात 19407 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

रिलायन्सला जोरदार नफा

जूनच्या तिमाहीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला ग्राहकेंद्रीत व्यवसाय रिटेल आणि टेलिकॉममधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ पाहायला मिळाली. जिओ टेलिकॉमच्या ग्राहकांमध्ये वाढ झाल्यानं फायदा झाला. तर रिलायन्स रिटेलच्या स्टोअर नेटवर्कच्या वाढीनं आणि ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादानं फायदा झाला आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा ऑपरेशनल रेवेन्यू 5.26 टक्क्यांनी वाढून 2.48 लाख कोटी झाला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न 2.36 लाख कोटी रुपये होतं. कंपनीच्या माहितीनुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लिस्टेड गुंतवणुकीच्या विक्रीतून झालेली कमाई 8924 कोटी रुपये राहिली. रिलायन्स इंडस्ट्रीजनं एशियन पेंटसमधील भागीदारी विकली होती. कंपनीचा मुख्य व्यवस्या पेट्रोलिंग रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलच्या कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण झाल्यानं आणि कमी प्रमाणात रिफायनिंग झाल्यानं या व्यवसायात 1.5 टक्क्यांची घसरण झाली.

नव्या वर्षाची मजबूत सुरुवात : मुकेश अंबानी

कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या माहिजीनुसार जिओ-बीपीद्वारे परिवहन इंधनाच्या देशांतर्गत विक्रीच्या वाढीनं महसूल वाढण्यात फायदा झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी म्हटलं की रिलायन्सनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये चांगली सुरुवात केली आहे. मुकेश अंबानी यांनी जगभरातील घडामोडी आणि आर्थिक क्षेत्रातील तेजी घसरण यानंतर देखील पहिल्या तिमाहीत कर पूर्व उत्पन्नात चांगली सुधारणा झाल्याचं म्हटलं.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Embed widget