एक्स्प्लोर

Budget 2024: करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळणार? 'इतके' उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता

Tax Rebate budget expectations : लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकार करदात्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे.

Budget 2024 Tax Rebate budget expectations :  निर्मला सीतारमण हे एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) जाहीर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) सादर होणाऱ्या या अंतरिम अर्थसंकल्पात करदात्यांना चांगली बातमी मिळू शकते. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कर प्रणालीअंतर्गत (New Tax Regime) कर सवलतीची (Tax Rebate) मर्यादा ही 7 लाखांहून वाढवून ती 7 लाख 50 हजारापर्यंत केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आठ लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असू शकते. यामध्ये 50 हजारांचे स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश आहे. यासाठी अर्थ विधेयकात बदल केला जाऊ शकतो.

मागील वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीत कर सवलत मर्यादा ही पाच लाख रुपयांहून सात लाखापर्यंत करण्यात आली होती. मागील अर्थ संकल्पात नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली होती. त्याशिवाय, जुनी कर प्रणालीचा पर्याय कायम ठेवण्यात आला होता. 

'मिंट' या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अंतरिम बजेटमध्ये करदात्यांना दिलासा दिला जाऊ शकतो. एका सूत्राने सांगितले की, 'याचा उद्देश कष्टकरी मध्यमवर्गीय लोकांना कर सवलती देणे हा आहे. निवडणुकीनंतर सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात काही बदल केले जाऊ शकतात. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रस्तावासाठी वित्त विधेयक आणले जाऊ शकते. कर प्राप्तीची व्याप्ती वाढवण्यासोबतच केंद्र सरकार करदात्यांच्यावरील कराचा बोजा कमी करण्यासाठी काम करत आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये विक्रमी 8.18 कोटी लोकांनी ITR दाखल केला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ टक्के अधिक आहे. 

नवी आणि जुनी कर प्रणाली 

नवीन कर प्रणाली पहिल्यांदा 2020 च्या अर्थसंकल्पात जाहीर घोषणा करण्यात आली. अर्थ मंत्रालयाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी नवीन कर प्रणाली (New Tax Regime) आणि जुनी कर प्रणाली (Old Tax Regime) दोन्ही लागू केली आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी आणि कर सूट मिळवण्यासाठी करदाते दोन पर्यायांपैकी एक निवडू शकतात. मात्र, नवीन कर प्रणाली डीफॉल्ट ठेवण्यात आली आहे. तुम्हाला जुन्या कर प्रणालीचे फायदे मिळवायचे असतील तर ते निवडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या कंपनीला तुमच्या पसंतीबद्दल माहिती दिली नसेल, तर आता तुमच्यावर नवीन कर प्रणाली अंतर्गत कर आकारला जाईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget