एक्स्प्लोर

RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नाशिकमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक लिमिटेड, नाशिकवर निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध सहा महिने लागू असतील. 

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार नाशिक जिल्ह्यातील एका सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक लिमिटेडवर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्बंध लादले आहेत. निर्बंधांचा कालावधी 17 जुलै रोजी बँकेचं कामकाज संपल्यापासून सुरु होईल. आरबीआयनं या संदर्भातील निर्णय 16 जुलै 2026 रोजी घेतला आहे.  आरबीआयनं बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत ठेवीदारांच्या हितासाठी ही कारवाई केली आहे. 

आरबीआयकडून नाशिकच्या सहकारी बँकेवर निर्बंध

आरबीआयनं बँकिंग नियमन कायदा 1949 च्या सेक्शन 35 A आणि सेक्शन 56 नुसार पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक लिमिटेड, नाशिकवर कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयनं बँकेवर निर्बंध लादल्यानं बँक आता नव्यानं ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, मालमत्तेची विक्री करणे यासारख्या इतर कामांस मनाई करण्यात आली आहे.   आरबीआयनं लादलेल्या निर्बंधांची माहिती बँकेत दर्शनी भागात लावण्यास सांगण्यात आलं आहे. आरबीआयनं ठेवीदारांच्या बचत किंवा चालू खात्यातून 1 लाखांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. ठेवीदारांच्या खात्यातील शिल्लक कर्जाची रक्कम भरायची असल्यास आरबीआयच्या सूचनांप्रमाणं कार्यवाही करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे, वीज बिल इत्यादी खर्चांसाठी रक्कम खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. 
    
आरबीआयनं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक लिमिटेड, नाशिकवर निर्बंध लादण्याची कारवाई ठेवीदारांच्या हितासाठी केल्याचं सांगितलं आहे. 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसीचं संरक्षण असेल. ठेवीदारांनी यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांसोबत आणि डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी  कॉर्पोरेशनच्या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

आरबीआयनं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक लिमिटेड, नाशिकवर निर्बंध लादले असले तरी या बँकेंचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला नाही. बँक निर्बंधांसह आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँकिंग व्यवसाय सुरु ठेवू शकते. आरबीआयकडून बँकेच्या आर्थिक स्थितीचं नियंत्रण केलं जाईल. दरम्यान आरबीआयनं लादलेले निर्बंध 17 जुलैपासून सहा महिने कालावधीसाठी असतील. 

दरम्यान, आरबीआयनं मुथूट फायनान्स लिमिटेड,सत्य मायक्रो कॅपिटल लिमिटेड,पॅन इमामी कॉस्मेड लिमिटेड, धनी लोन्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड,मुथूट वेईकल्स अँड असेट फायनान्स लिमिटेड,अविल फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड या फायनान्स कंपन्यांना आर्थिक दंड केलेला आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
Advertisement

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Embed widget