एक्स्प्लोर

RBI Repo Rate Cut: आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात, कर्ज स्वस्त होणार, रेपो रेट 6.25 टक्क्यांवर

RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आरबीआयचं पतधोरण जाहीर केलं. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचं म्हटलं.

RBI MPC Meeting 2025 Repo Rate Cut नवी दिल्ली : आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरणाविषयासंदर्भात माहिती दिली. पतधोरण विषयक समितीची बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. पतधोरण समितीच्या बैठकीकडे देशातील लोकांचं मोठ्या प्रमाणावर लक्ष लागलं आहे. पतधोरणातील बैठकीतील घोषणांसह गव्हर्नरचं वक्तव्य आरबीआयसाठी महत्त्वाचं असतं, असं संजय म्हलोत्रा म्हणाले. आरबीआयच्या पतधोरण समितीनं एकमतानं  25 बेसिस पॉइंटनं कमी करण्याचा निर्णय घेतला. 6.25 टक्के रेपो रेट असेल, असं संजय म्हलोत्रा म्हणाले. आरबीआयचे गव्हर्नर म्हणून संजय म्हलोत्रा यांनी पहिलं पतधोरण जाहीर करताना हा मोठा निर्णय जाहीर केला. आरबीआयच्या गेल्या सात पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला होता.  

आरबीआय विविध मुद्यांवर पतधोरणात मुद्यांवर भाष्य करते, असं संजय म्हलोत्रा म्हाले. भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे, असंही त्यांनी म्हटलं. 

जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण आव्हानात्मक आहे. ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी दरानं जागतिक अर्थव्यवस्थेत वाढ होतेय.  अमेरिकेनं व्याज दर कपात केली नाही. अमेरिकेनं डॉलर मजबूत होत आहे. यील्ड बॉंड्स मजबूत होते, याच विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला, असं संजय म्हलोत्रा यांनी सांगितलं.  मात्र, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं संजय म्हलोत्रा म्हणाले. भारतीय रुपया घसरण होत असल्याचं आपण पाहतोय पण विविध आव्हानांचा सामना करण्यास आरबीआय सज्ज असल्याचं संजय म्हलोत्रा म्हणाले.

आरबीआयच्या पतधोरण समितीनं एकमतानं रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं घटवून 6.25 टक्के करत असल्याचं संजय म्हलोत्रा म्हणाले. एसडीएफ रेट 6.0 टक्के असेल. एमसीएफ आणि बँक रेट 6.5 टक्के असेल. एमपीसीएनं एकमतानं तटस्थ भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. महागाईचा नियंत्रित करताना आर्थिक विकासावर भर देण्याचं धोरण स्वीकारल्याचं संजय म्हलोत्रा म्हणाले. 

पतधोरण समितीनं महागाई कमी झाल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे.  अन्न पदार्थांच्या किमतींचा आढावा आणि मागील एमपीसीच्या निर्णयांचा परिणाम असेल. 

पतधोरण समितीनं विकास वाढीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पतधोरणामध्ये 25 बेसिस पाईंटची कपात करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयच्या पतधोरण समितीचं जागतिक घडामोडींवर लक्ष असेल, असं संजय म्हलोत्रा म्हणाले. 

पहिल्या अंदाजानुसार रिअल जीडीपी दर 6.4 अंदाजित होता. गेल्या वर्षी 8.2 टक्के दर होता. येत्या काळातील आर्थिक घडामोडी, कृषीक्षेत्रात रब्बीत चांगल्या पिकांची अपेक्षा आहे, उत्पादन क्षेत्रात देखील वाढीची शक्यता आहे. सेवा क्षेत्र चांगली कामगिरी करत आहे. ग्रामीण भागातील मागणी वाढत आहे, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.  रोजगार  वाढत आहे, केंद्राच्या अर्थसंकल्पात करसवलत देण्यात आलीय, उद्योगाकडून चांगल्या आशा आहेत, गुंतवणूक वाढण्यासाठी सरकार प्रयत्नशील दिसते, असं संजय म्हलोत्रा यांनी म्हटलं. या सर्वांचा विचार करुन रिअल जीडीपी रेट पुढील वर्षात जीडीपी पहिल्या तिमाहीत 6.7 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 7 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.5 राहील असा अंदाज संजय म्हलोत्रांनी व्यक्त केला.

इतर बातम्या : 

RBI Repo Rate Cut: रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात कपातीच्या घोषणेकडे लक्ष, मध्यमवर्गाला दिलासा मिळणार?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget