एक्स्प्लोर

RBI : आता यूपीआयला क्रेडिट कार्ड लिंक होणार, आरबीआयचा महत्त्वाचा निर्णय

Credit Cards Links to UPI : यूपीआयद्वारे व्यवहार आणखी वाढवण्यावर आरबीआयचा भर असून त्याचाच भाग म्हणून आता यूपीआयला क्रेडिट कार्ड लिंक करण्यात येणार आहे.

मुंबई : आरबीआय आता यूपीआय अर्थात यूनिफाईड पेमेन्ट्स इंटरफेस (Unified Payments Interface -UPI) संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. येत्या काळात क्रेडिट कार्ड यूपीआयला जोडण्यात येणार असून त्यामुळे देशातल्या असंख्य ग्राहकांना, क्रेडिट कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे. त्याची सुरुवात रुपे कार्डपासून (RuPay card) करण्यात येणार असल्याची  माहिती आहे. 

कॅशलेस इंडियाकडे वळतांना सर्वात मोठा वाटा होता तो फिनटेक कंपन्यांचा. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली. त्यातल्या त्यात यूपीआय मार्फत मोठ्या प्रमाणात व्यवहार वाढू लागलेत. यात आणखी भर पडावी यासाठी आरबीआयकडून आणखी एक सुविधा अंमलात आणण्याचा विचार आहे. आता युपीआयच्या माध्यमातून कोट्यवधी ग्राहक केवळ बचतखाते किंवा चालू खात्यातूनच नव्हे तर क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट करू शकतील. त्यामुळे युपीआयद्वारे पेमेंट करणं सोपं होईल. 
 
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारा जारी केलेल्या रुपे क्रेडिट कार्डद्वारे याची सुरुवात होईल. सिस्टिम विकसित होत असताना इतर कार्ड जसे मेस्ट्रो, व्हिजा क्रेडिट कार्डसारख्या कार्डसाठी देखील ही सुविधा उपलब्ध होईल. या निर्णयाचा शेअरबाजारावरही परिणाम बघायला मिळाला. एसबीआय कार्ड, पेटीएम, ॲक्सिस बॅंकसारख्या बॅंकांचे देखील शेअर्स वधारलेत. याचं मुख्य कारण, बॅंकांसोबतच फिनटेक कंपन्यांना ही सुविधा गेमचेंजर मानली जात आहे. 

कसा होणार फायदा?

  • देशात तब्बल 10 लाख कोटींहून अधिकचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होतात.
  • यूपीआयला 26 कोटी वापरकर्ते तर 5 कोटी व्यापारी जोडले गेलेत.  
  • मे महिन्यात युपीआयद्वारे 594.63 व्यवहार झाले आहेत. ज्यात 10.40 लाख कोटींचे व्यवहार एकट्या यूपीआयद्वारे झाल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे.
  • यूपीआयद्वारे व्यवहार आणखी वाढवण्यावर आरबीआयचा भर आहे. 
  • ग्राहकांना या निर्णयाचा फायदा तर होईलच, सोबतच बॅंकिंग सिस्टिम, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट गेटवेंना देखील मदत होईल.
  • मागील अनेक दिवस गटांगळ्या खात असलेल्या पेटीएमचे शेअर्स देखील वधारल्याचे चित्र आहे 

यूपीआयची व्याप्ती वाढवण्यासोबतच रुपी कार्डद्वारे व्यवहार वाढवण्यावरही सरकारचा भर आहे. मात्र, आतापर्यंत तुम्ही तुमच्या खिशात जितके पैसे असायचे तितकेच पैसे खर्च करायचा. आता मात्र तुम्ही यूपीआयद्वारे तुमच्या खिशात नसलेले पैसेही वापरू शकणार आहात. त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलचे नियोजन नीट करत असाल तर हा निर्णय तुमच्या फायद्याचा आहे, नाहीतर तुमच्यावरील कर्ज वाढण्याचा धोका देखील आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Embed widget