एक्स्प्लोर

RBI Penalty : आरबीआयकडून 3 बँकांना कोट्यवधींचा दंड, 5 कोऑपरेव्हि बँकांनाही दणका

RBI Penalty on Banks : आरबीआयने निर्देशांचे पालन न केल्याबद्दल तीन बँकांना 10.34 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पाच को-ऑपरेटिव्ह बँकांनाही दणका दिली आहे.

RBI Monetary Penalty : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) निर्देशांचे पालन न केल्याबद्दल तीन बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावला (Monetary Penalty) आहे. आरबीआय (RBI) ने नियमांचं उल्लंघन (Violation of Rules) केल्याप्रकरणी बँकांना 10 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सिटी बँक (Citibank) वर सर्वाधिक पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ला 4.34 कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला (Overseas Bank) एक कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, पाच को-ऑपरेटिव्ह बँकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. 

कारवाईचं नेमकं कारण काय?

खासगी क्षेत्रातील सिटी बँकेला सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकेवर बँकिंग नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तसेच, जोखीम व्यवस्थापन आणि वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगसाठी RBI मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाही. तर, बँक ऑफ बडोदावर सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ लार्ज कॉमन एक्सपोजरच्या स्थापनेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यासोबतच, चेन्नईस्थित सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक कर्ज आणि आगाऊ नियमांचे पालन न केल्याबद्दल दोषी आढळली आहे. त्यामुळे या बँकेलाही दंड ठोठावण्यात आल आहे.

ग्राहकांना फटका बसणार नाही

मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन न केल्यामुळे या तिन्ही बँकांवर हा दंड ठोठावण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यन, ग्राहकांना बँकांवरील कारवाईचा फटका बसणार नाही. बँका आणि त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हा या कारवाईचा उद्देश नाही. आरबीआयने या बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये त्याला दंड टाळण्यासाठी स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे.

पाच सहकारी बँकांनाही ठोठावला दंड

यापूर्वी आरबीआयने विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच सहकारी बँकांवर दंड ठोठावला होता. यामध्ये श्री महिला सेवा सहकारी बँक, पोरबंदर विभागीय नागरिक सहकारी बँक, सर्वोदय नागरिक सहकारी बँक, खंभात नागरिक सहकारी बँक आणि वेजलपूर नागरिक सहकारी बँक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 25 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अभ्युदय बँकेवर मोठी कारवाई

आरबीआय शुक्रवारी अभ्युदय बँकेला मोठा दणका दिला आहे. अभ्युदय बँकेचं संचालक मडळ आरबीआयने 1 वर्षासाठी बरखास्त केलं आहे. मात्र, बँकेच्या कारभारावर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाहीत. सेंट्रल बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची अभ्युदय सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय सल्लागारांची समितीही नेमण्यात आली आहे. अभ्युदय सहकारी बँकेच्या कारभाराच्या दर्जाहीन दर्जामुळे ही कारवाई करणं भाग पडल्याचं रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Embed widget